Representational Picture (photo credit- File image)

Thane Crime: ठाण्यात एका महिलेने आपल्या पहिल्या पतीचे अपहरण (Kidnapping) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेने तिच्या भाऊ आणि आणखी चार नातेवाईकांसोबत आपल्या पतीचे अपहरण केले. पैशांसाठी पतीचे अपहरण केल्याचे पोलिसांनी सांगितले.  ही घटना सोमवारी घडली आहे. या घटनेनंतर महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी चर्चेत आलेल्या 'त्या' शाळेतील मुलीने सोडले घर? पीडिता छत्रपती संभाजीनगर शहरात आढळल्याची माहिती)

मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटच्या सेंटलमेंटसाठी महिले आपल्या पतीचे अपहरण केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. उल्हासनगर येथील पंजाब कॉलनी येथून २० जून रोजी पीडिताचे अपहरण करण्यात आले. खरेदीसाठी बाहेर गेल्यानंतर चार जणांनी त्याला घेरले आणि त्यांनंतर त्याचे घटनास्थळावरून अपहरण केले. महिलेने आपल्या पतीला एका खोलीत डांबून ठेवले असून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपी महिलेने पतीला त्याच्या घटस्फोट सेटेंलमेंट नुकसानभरपाईची रक्कम १५ लाखांवरून २० लाखांपर्यत वाढवण्याची धमकी दिली. शनिवारी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे त्याची पत्नी, तिचा भाऊ आणि अन्य चार जणांविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत १४० (२), ३५१ (२), ३५२, ११५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.