Viral: सुंदर दिसण्यासाठी तरुणीने फेविकॉल लावून चिटकवल्या पापण्या, तासाभरातच चेहऱ्याचा झाली अशी अवस्था
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Viral: सध्या महिला अतिसुंदर दिसण्यासाठी विविध कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करतात. मात्र यामधील काही प्रोडक्ट्स हे सर्वांनाच सूट होतील असे नाहीत. त्याचे भयंकर परिणाम सुद्धा शरिरावर दिसून येतात. त्यामुळे कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स वापरण्यापूर्वी त्याची पॅट टेस्ट करुन घ्यावी. पॅच टेस्ट म्हणजे शरिरावर एखाद्या ठिकाणी लहान भागात ते लावून पहावे. जेणेकरुन ते शरिराला लावल्यास त्यापासून कोणतेही अॅलर्जी होणार नाही हे पहावे. याच पार्श्वभूमीवर ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने त्याचे गंभीर परिणाम एका तरुणीला भोगावे लागले आहेत. सदर तरुणी ही इंग्लंड मधील असून जेसिका असे तिचे नाव आहे.

जेसिकाला तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जायचे होते. म्हणून तिने स्वत: ला सुंदर असा मेकअप केला. अधिक सुंदर दिसता यावे यासाठी तिने आपल्या पापण्या मोठ्या दिसाव्यात म्हणून एक युक्ती केली. जेसिका हिने तिच्याकडे असलेल्या खोट्या पापण्या लावल्या. पण जेव्हा ती बाहेरुन घरी आली त्यानंतर तिचे डोळे अत्यंत दुखण्यास सुरुवात झाली होती. त्याचसोबत स्वत:चा चेहरा खुप सुजल्याने तिला काही कळत नव्हते. खरंतर जेसिका हिने पापण्यांना लावलेल्या गममुळे तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली होती.(Viral Video: बायकोला पुरुष डॉक्टरने दिली कोरोनाची लस, संतापलेल्या नवऱ्याने राज्यपालांच्या लगावली कानशिलात)

जेसिका हिने म्हटले की, आपल्या फेक रशियन आयलॅशेसमुळे तिला अॅलर्जी झाली आहे. यापूर्वी सुद्धा तिने ते वापरले होते. मात्र त्यावेळी असे काही झाले नव्हते. परंतु दुसऱ्या वेळेस जेव्हा ते आयलॅशेस वापरले त्याचे परिणाम भयंकर झाले. 25 वर्षाच्या जेसिका हिला डोळे सुद्धा उघडता येत नव्हते. ग्लू च्या कारणामुळे तिचे डोळे एकमेकांना चिटकले गेले होते.

आपल्या डोळ्यांची झालेली ही अवस्था पाहून ती रुग्णालयात उपचारासाठी आले. तेथे तिला सांगण्यात आले की, तिला कॉर्नियल एब्रेशन झाले आहे. जवळजवळ एक आठवडाभर औषध घेतल्यानंतर दुखणे कमी झाले. आयलॅशेस ग्लू लावून चिकटवल्याने तिचा चेहऱ्याची वाईट अवस्था झाली होती.