Viral Video: बायकोला पुरुष डॉक्टरने दिली कोरोनाची लस, संतापलेल्या नवऱ्याने राज्यपालांच्या लगावली कानशिलात
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Viral Video: ईरान (Iran) मध्ये भाषण देणाऱ्या राज्यपालांना समोर बसलेल्या एका व्यक्तीने मंचावर चढून जोरदार कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यक्तीने अचानकपणे राज्यपालांना मारल्याने काही सेकंदासाठी नेमके काय घडतेय हे कोणालाच कळले नाही. मात्र नंतर याबद्दल चौकशी केला असता त्यामागील कारण समोर आले पण ते सर्वांना हैराण करणारे होते.(Poisonous Snakes in India: भारतातील विषारी फुरसे साप Shipping Container च्या माध्यमातून इंग्लंडला पोहोचला)

द गार्जियनच्या रिपोर्ट्सनुसार, ब्रिगेडियर (रि) Abedin Korram हे नुकतेच ईरानच्या पूर्व अजरबैजान प्रांताचे राज्यपाल झाले आहेत. ते एका कार्यक्रमात भाषण देण्यासाठी मंचावर उभे राहिले. त्यांनी भाषण ही सुरु केले पण तेवढ्याच एका व्यक्तीने मंचावर चढून त्यांना कानशिलात लगावली. त्याने कानाखाली मारल्याचा आवाज ऐवढा जोरात होता की, माइकच्या माध्यमातून तो सर्वत्र पसरला गेला.(Viral Video: थुंकी लावून तंदुरी रोटी बनवत असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस, आरोपीला अटक)

Tweet:

राज्यपालांवर हल्ला केल्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकांनी मंचावर धाव घेतली आणि त्यांना बाजूला घेतले. तसेच अन्य जणांनी संतापलेल्या व्यक्तीला आवरले. तर पोलिसांनी चौकशी केली असता हल्लेखोराची ओळख ही एक सिक्युरिटी गार्डच्या रुपात झाली आहे. त्याने असे म्हटले की, त्याच्या बायकोला एका पुरुष डॉक्टरने कोरोनावरील लस दिली होती. असे करुन त्या डॉक्टरने बायकोला स्पर्श केला. यामुळेच त्याला राग आला होता आणि शासकीय प्रमुखांच्या नात्याने राज्यपालांना धडा शिकवायचा होता. सध्या पोलिसांनी त्याचे जुने रेकॉर्ड मिळवले आहेत.