Man Spitting on Tandoori Roti (Photo Credits-Twitter)

Viral Video: उत्तर प्रदेशातील गाजियाबाद मधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती थुंकी लावून रोटी आणि नान तयार करत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा गाजियाबाद मधील सिहानीगेट परिसरातील असल्याचे बोलले जात आहे. व्यक्तीच्या या प्रकारावरुन नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.(Viral Video: आयस्क्रिम-चॉकलेट वापरुन डोसा तयार केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल, युजर्सने दिल्या 'अशा' प्रतिक्रिया)

व्हायरल झालेल्या व्हिडिओत असे दिसून येते की, एक व्यक्ती तंदूरी रोटी तयार करत आहे. त्याचवेळी तो पीठाने तयार केलेल्या रोटीवर थुंकतो आणि ती भट्टीत भाजण्यासाठी टाकतो. रेस्टॉरंटमध्ये अन्य लोक सुद्धा उभे असल्याचे दिसून येत आहे. मात्र कोणाचे ही लक्ष त्या व्यक्तीकडे जात नाही. रेस्टॉरंटच्या बाहेरुन कोणत्या तरी व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला असून तो खुप व्हायरल होत आहे.(अतिघट्ट पँन्ट घातल्याने तरुणीची बिघडली तब्येत, थेट ICU मध्ये करावे लागले भर्ती)

Tweet:

सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी खुप गदारोळ केला. तसेच ज्या हॉटेलमधील हा व्हिडिओ आहे त्याच्या विरोधात कारवाई करण्याची सुद्धा मागणी करत आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी रोटी तयार करणाऱ्या तमीजुद्दीन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच हॉटेलच्या विरोधात ही गुन्हा दाखल केला आहे.