अतिघट्ट पँन्ट घातल्याने तरुणीची बिघडली तब्येत, थेट ICU मध्ये करावे लागले भर्ती

अमेरिकेतील एका 25 वर्षीय मुलीला अतिघट्ट शॉर्ट पँन्ट महागात पडल्याचे समोर आले आहे. याबद्दल तरुणीने तिचा अनुभव सुद्धा शेअर केला आहे. तिने असे म्हटले की, अतिघट्ट शॉर्ट पँन्ट घातल्याने तिला धोकादायक स्किन इंफेक्शनला सामोरे जावे लागले होते. तिची तब्येत ऐवढी बिघडली की, तिला थेट रुग्णालयात भर्ती करावे लागले. तसेच तरुणीला आयसीयु मध्ये सुद्धा उपचारासाठी दाखल करावे लागले होते.(Viral video: सराफाच्या दुकानात महिलेची हुशारीने दागिन्यांवर हात सफाई, पहा नेमके पुढे काय झाले)

डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार सॅम असे तरुणीचे नाव आहे. जी उत्तर कॅरोलिना येथे राहते. तिने आपल्या टिकटॉक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो जवळजवळ 80 लाख वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओमध्ये सॅम हिने असे म्हटले की, तिला अतिघट्ट जिन्स पँन्ट घालणे कसे महागात पडले होते. या पँन्टमुळे तिच्या कमरेला सुद्धा खुप इन्फेक्शन झाले होते.(Woman Fell From Balcony While Having Sex: सेक्स दरम्यान अर्ध नग्न अवस्थेत बालकनीतून कारच्या छतावर पडली महिला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण)

आधी तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. पण तब्येत अधिक बिघडली तेव्हा तिला आयसीयु मध्ये हलवण्यात आले. एक आठवडाभर तिला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. तिने असे म्हटले की, तिला सेप्सिस आणि सेलुलिटिस झाले होते. सॅम असे म्हटते की, तिला डॉक्टरांना वारंवार तिच्या जखमा दाखवण्यासाठी पँन्ट खाली करावी लागत असे. परंतु मृत्यूच्या दरवाज्यातून ती परतल्याने तिने आनंद व्यक्त केला.