Viral Video: आयस्क्रिम-चॉकलेट वापरुन डोसा तयार केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल, युजर्सने दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
Ice Cream Chocolate Dosa (Photo Credits-Twitter)

Viral Video:  जगभरात मिळणाऱ्या विविध फूड्सची चव घेण्यासाठी फूड लव्हर्स नेहमीच तयार असतात. परंतु काही फूड्स सोबत वेगळेच कॉम्बिनेशन करुन खाण्यात काहींना आनंद वाटतो तर काहींना ते विचित्र असल्यासारखे वाटते. अशातच सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती डोसा तयार करण्यासाठी बटाट्याच्या भाजी ऐवजी आयस्क्रिम आणि चॉकटलेटचा वापर करताना दिसून येत आहे. तुम्हाला तरी यावर विश्वास बसेल का किंवा तुम्हाला अशा पद्धतीचा डोसा खायला आवडेल का? यावरुनच युजर्सने विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दुकानदार प्रथम डोसाच्या तव्यावर त्याचे पीठ टाकून तो तयार करतो. त्यानंतर त्यावर आयस्क्रिम आणि चॉकलेटचे सीरप टाकतो. या दोन्ही गोष्टी एकत्रित करत तो डोसा तयार करतो आणि ग्राहकाला खाण्यासाठी देतो.(Parle G Rumors: बिहार मध्ये पार्ले जी बिस्किटाविषयी पसरली अजब अफवा; दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा)

Tweet:

ट्विटरवरील विजय शेठ नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने व्हिडिओला रागातील इमोजी सुद्धा दिला आहे. या व्हिडिओ शेकडो लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने असे म्हटले की, अशा प्रकारची माणसे येतात कुठून? अन्य एकाने म्हटले, उत्तम चवीच्या फूड्स सोबत असे करणे चुकीचे आहे. अजून आणखी काही लोकांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.