कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत असताना या आजाराने मागील काही दिवसात लाखो बळी घेतले आहेत. अद्याप या आजारावर ठोस औषध नसल्याने सार्यांमध्येच त्याची दहशत आहे. कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. या जीवघेण्या आजाराबाबत पुराणात काही संदर्भ मिळत असल्याचेही दावा आहे. सोशल मीडियामध्ये याबाबत अनेक उलट सुलट चर्चा आहेत. यापैकी एक म्हणजे तुलसीदास लिखित रामचरितमानस मध्ये कोरोना व्हायरस सारख्या आजाराचे संदर्भ आढळतात असेही दावे सांगितले जात आहेत. रामायणाची कथा सांगणार्या या हिंदी साहित्यामध्ये कोरोना आजाराबाबातचेही काही संदर्भाशी साधर्म्य साधणारे हे दोहा पहा काय सांगतात. Coronavirus: आव्हान अजून संपले नाही!; चीनमध्ये पुन्हा 11 जण आढळले COVID-19 संक्रमित; कोरोना बाधितांचा एकूण आकडा.
16 व्या दशकामध्ये तुलसीदासांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहला. सामान्यांना पुरूषोत्तम श्रीरामाची कहाणी त्यांनी सहज साध्या शब्दांत उलगडून सांगितली. यापैकी दोहा 120 - "सब कै निंदा जे जड़ करहीं। ते चमगादुर होइ अवतरहीं॥ सुनहु तात अब मानस रोगा। जिन्ह ते दु:ख पावहिं सब लोगा॥14॥" म्हणजे जी लोकं सतत इतरांचा मत्सर करतात, टीका करतात त्यांच्यासाठी आम्ही वटवाघुळ बनून परत येऊ. हा मनाचा आजार आहे आणि त्यातून सारेच जाणार. त्यानंतर 121 व्या दोह्यामध्ये "मोह सकल ब्याधिन्ह कर मूला। तिन्ह ते पुनि उपजहिं बहु सूला॥ काम बात कफ लोभ अपारा। क्रोध पित्त नित छाती जारा॥15॥ असं म्हटलं आहे. ज्याच्यामध्ये आजारामुळे फुफ्फुसांमध्ये त्रास, कफाचा त्रास याबद्दल सांगितलं आहे. वासना ही वाहणार्या वार्याचा एक भाग आहे. तीव्र लोभ हा कफच्या विपुलतेशी संबंधित आहे. तर क्रोध, राग पित्ताशी निगडीत आहे आणि हे शरीराला त्रासदायक आहे. "प्रीति करहिं जौं तीनिउ भाई। उपजइ सन्यपात दुखदाई।। बिषय मनोरथ दुर्गम नाना। ते सब सूल नाम को जाना।।16|| ज्यामध्ये असं सांगितलंय जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतील तेव्हा गंभीर आजारात ताप येईल.
ज्यांना या साहित्याची माहिती आहे त्यांना या गोष्टीचा थेट संदर्भ कोरोना व्हायरस आजाराशी लागेल. जेव्हा जगात पाप वाढेल तेव्हा आजार वाढेल. तसेच यामध्येही वटवाघुळाचा संदर्भ आहे. काही दाव्यांनुसार कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमध्ये वटवाघुळामध्ये आहे. त्यामुळे अनेकांचा असा विश्वास आहे की रामचरितमानस कोव्हिड 19 आणि कोरोना व्हायरसच्या महामारीचे संकेत देतात.