Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) अर्थातच कोविड 19 (COVID-19) या विषाणूचे उगमस्थान राहिलेल्या चीनने मोठ्या शताफीने या विषाणूवर नियंत्रण मिळवले. चीननंतर जगभरात पसरलेला हा आजार अद्यपही आव्हान कायम ठेऊन आहे. दरम्यान, हा विषाणू चीनमध्ये पुन्हा एकदा डोके वर काढतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण, चीनमध्ये पुन्हा एकदा COVID-19 विषाणूचे 11 नवे रुग्ण सापडले आहेत. चीनच्या नेशनल हेल्थ कमीशन (National Health Commission in china) द्वारा ही माहिती मंगळवारी दिण्यात आली. या विभागाने एका अहवालात म्हटले आहे की, या 11 रुग्णांपैकी 4 जण हे विदेशातून आले आहेत. उर्वरीत 7 जण हे चीनमधीलच आहेत.

वृत्तसंस्था सिन्हुआाने चीनच्या हेल्थ कमीशनचा हवाला देत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सहा रुग्ण हे हेइलोंगजियांग आणि एक रुग्ण हा गुआंग्डोंग प्रांतात आढळला आहे. उर्वरीत 4 रुग्ण हे विदेशातून आले आहेत. दरम्यान, चिनच्या इतर भागात अद्याप तरी कोणतेही नवे रुग्ण आढळले नाहीत. विदेशातून आलेल्या दोघांची आणि हेइलोंगजियांग प्रांतातील एका रुग्णाची ओळख पटली आहे.

हेल्थ कमीशनने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत नव्याने सापडलेल्या 39 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयांतून सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे. तर उर्वरीत कोरोना व्हायरस संक्रमित 82 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, आजघडीला चीनमध्ये विदेशातून आलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1587 इतकी आहे. त्यातील 776 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली. त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 811 रुग्ण सध्यास्थितीत उपचार घेत आहेत. यातील 44 जणांची प्रकृती अधिक गंभीर आहे. (हेही वाचा, Coronavirus: चीनमध्ये Xi Jinping यांच्या सत्तास्थानाला कोरोना व्हायरस संकटामुळे धक्का?)

दरम्यान, चायना हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 82,758 इतकी राहिली. त्यातील 1003 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. 77123 रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. 4638 नागरिकांचा मृत्यू झाला. स्पेशल अॅडमिनिस्ट्रेटिव रीजन (एसआरएल) हाँकाँगमध्ये सोमवारपर्यंत 4 जणांच्या मृत्यूसह कोरोना संक्रमित 1025 रुग्णांची पुष्टी करण्यात आली.