कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे अवघे जग लॉकडाऊन (Lockdown) झाले आहे. या संकटाने जगभरातील विविध देशांमध्ये हाहाकार उडवून देत मोठ्या प्रमाणावर जीवित हानी केली आहे. आर्थिक हानीची तर गणतीच नाही. यात महासत्ता अमेरिका (United States), इटली (Italy), जपान (Japan), जर्मनी (Germany) यांसाख्या विकसित देशांचाही समावेश आहे. परंतू, असे असले कोविड-19 (COVID-19 ) विषाणू म्हणजेच कोरोना व्हायरस ज्या चीनने जगाला दिला तो चीन (China) मात्र या संकटातून सहीसलामत बाहेर पडला आहे. हे एक विशेषच. त्यामुळे चीन देशावरील संशय वाढून आता अवघे जग विरुद्ध चीन असा सामना रंगतो की काय अशी स्थिती आहे. त्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि त्या दोशाचे तहहयात अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सत्तास्थानालाही धोका निर्माण होतो की काय? अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेबाबतचा हा एक आढावा.
चीन 1968 नंतर प्रथमच इतक्या मोठ्या अडचणीतून जात आहे. असे असले तरी कोविड 19 सारख्या महासाथीच्या संकटातून देशाला सहीसलामत बाहेर काढण्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मोठे यश आले आहे. शी जिनपिंग यांचे वर्तन हुकूमशहा प्रमाणे आहे. त्यावर अनेकदा जगभरातून टीका केली जाते. या टीकेचा मात्र जिनपिंग यांच्या चीनमधील लोकप्रियतेवर विशेष परीणाम होताना दिसत नाही. जिनपिंग यांची चीनमधील लोकप्रियता आजही कायम असल्याचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं सांगतात. (हेही वाचा, Coronavirus: चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे इंटर्नकडून चुकून लीक झाला कोरोना व्हायरस- Report)
चीन हा कम्युनिस्ट देश आहे. तिथे कम्युनिस्टांचे सरकार असून, एकपक्षीय सत्ताच चीनमध्ये कायम आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असलेल्या चीनमध्ये कोरोना व्हायरस संकट मोठे आव्हान होते. या आव्हानाचा समना करताना जिनपिंग हे मोठ्या राजकीय संधित करत असल्याचे चित्र आहे. जगभरातील अभ्यासक आणि जाणकारांचे म्हणने मात्र असे की, चीनमध्ये सर्वसामान्य नागरिकांमधून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विरुद्ध मोठा असंतोष निर्माण झाला आहे. चीनमधील राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणारे लोक सांगतात की, याबाबत वर्तमान स्थितीत तर विशेष असा निष्कर्ष काढता येत नाही. (हेही वाचा, Coronavirus Vaccine ची निर्मिती करण्यात इतक्यातच यश येईल याची शाश्वती नाही; जागितक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ David Nabarro यांची माहिती)
दरम्यान, अभ्यासकांच्या काही गटांचे असेही निरिक्षण आणि अनुमान आहे की, चीनमधील कम्युनिस्ट पक्षातच जिनपिंग यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढतो आहे. जिनपिंग हे व्यक्तिगत महत्वाकांक्षा ठेवतात. त्याच्या पूर्ततेसाठी विरोधक, जनता यांच्यावर दबाव टाकतात. त्यासाठी सरकारी यंत्रणांचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. कितीही टीका होत असली तरी सध्यातरी जिनपिंग यांच्या सत्तास्थानाला कोणताही धोका संभवत नाही.