Monsoon | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

Fact Check:  राज्यासह मुंबईत लवकरच मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र आजच सकाळच्या वेळेस मान्सूनच्या सरी मुंबईत पडल्याचे दिसून आले. अशातच सोशल मीडियात मुंबईतील मान्सून संदर्भातील बातमी तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये मुंबई मान्सूनमध्ये पाण्याखाली का जाते या बद्दल माहिती दिली असून महापालिकेवर सुद्धा त्यात निशाणा साधण्यात आला आहे. मात्र या व्हायरल मेसेजमागील सत्यता वेळगीच असल्याचे महापालिकेने ट्विट करत सांगितले आहे.(Mumbai Rains: मुंबईत मान्सून पूर्व पावसाला सुरुवात; पश्चिम उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी)

त्यामागील दोन कारणे सुद्धा दिली आहेत. एक म्हणजे अत्यंत कमी कालावधीत जर मुंबईत मुसळधार पाऊस पडला तर शहर पाण्याखाली जाते. दुसरे म्हणजे हाय टाइडवेळी बाहेर आलेले पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून जाण्यास वाव मिळत नसल्याचे तसे होते. या दोन्ही गोष्टी महापालिकेच्या हाताबाहेरील आहे. यामागे आणखी काही कारणे सुद्धा आहेत. असे सांगण्यात आले आहे.(Maharashtra Weather Updates: राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी 2 जून पर्यंत मान्सून पूर्व सरींनी महाराष्ट्र चिंब होण्याची शक्यता)

परंतु यावर महापालिकेने ट्विट करत म्हटले आहे की, अफवांना बळी पडू नये. कारण समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या या मेसेज मागील माहिती खोटी आहे. कृपया त्यावर विश्वास न ठेवण्यासह फॉरवर्ड करु नका.