Narayan Rane on Sharad Pawar: शरद पवार कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत, त्यांनी फक्त काँग्रेसला धमकी दिली- नारायण राणे
Narayan Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) वर्धापन दिन नुकताच पार पडला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकासआघाडी आणि आगामी निवडणुका यावर काही भाष्य केले. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना (Shiv Sena) लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढतील असे पवार यांनी म्हटले होते. या भाष्यावरुन भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करणारे ट्विट केले आहे. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आह की, 'शरद पवार कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत.' शरद पवारांनी आपल्या विधानातून काँग्रेसला धमकी दिल्याचेही नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.

नारायण राणे यांनी काय म्हटले ?

पहिल्या ट्विटमध्ये नाराणय राणे म्हणतात, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत.' (हेही वाचा, Shiv Sena-NCP Alliance: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य युतीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य)

नारायण राणे ट्विट एक

नारायण राणे दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात, 'ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.'

नारायण राणे ट्वट दोन

शरद पवार यांनी काय म्हटले?

शरद पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन पक्षांच सरकार स्थापन करुन आपण एकत्र काम करु असे कोणालाही वाटले नव्हते. परंतू, आम्ही एकत्र येत राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. हे सरकार चांगले काम करते आहे. त्यामुळे हे सरकार पुढची पाच वर्षे टीकेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. या वेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, पंतप्रदान आणि मुख्यमंत्री एकत्र भेटले की लगेच काही लोक वेगवेगळे शंका घेऊ लागले. आपण शिवसेनेसोबत कधी काम केले नाही. परंतू, शिवसेनेलाही महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पाहात आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस केवळ सरकारमध्येच नव्हे तर विधानसभा, लोकसभेतही एकत्र काम करेल आणि सामान्य जनतेचे नेतृत्व राज्य आणि देशात करेल, असे पवार म्हणाले होते.