Exam (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवारी दिनांक 27 मार्च 2021 रोजी नियोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 (Maharashtra Eng Services Pre Exam 2020) करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे (Hall Ticket) आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेल मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबण नेणे गरजेचे आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा पार पडणार होती. परंतु, महाराष्ट्रात कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University: वेळापत्रक जाहीर, पण परीक्षा कुठल्या अ‍ॅपवरून होणार? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी प्रचंड संभ्रमात

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेश पत्र डाऊनलोड कसे कराल?

1) MPSC चे अधिकृत संकेतस्थळ https://mpsc.gov.in/ किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in/ वर जा.

२) 'Maharashtra Eng Services Pre Exam Admit Card 2020' या पर्यायावर क्लिक करा.

३) त्यानंतर लॉगइन करा. एक नवी विंडो तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तेथे 'My Account Section' दिसेल, तेथे क्लिक करा.

४) कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टॅब चेक करा आणि तुमचे वर्ष आणि एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2020 निवडा.

५) आता तुमच्या स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल. ते डाऊनलोड करा आणि पीडीएफ सेव्ह करा आणि प्रिंटआउट मिळवा.