Female Candidate | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Assembly Elections 2024) एकून सर्वच्या सर्व म्हणजेच 288 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे. त्यासाठी विवीध राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, धक्कादायक असे की, यातील तब्बल 97 मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार () देण्यात आला नाही. म्हणजेच राज्यात निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेल्या 4,120 उमेदवारांपैकी केवळ 359 महिला (Women Representation) आहेत, जे एकूण 10% पेक्षा कमी प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे जर उमेदवारी करणाऱ्या महिलांचाच टक्का कमी असेल तर निवडून येणाऱ्या महिला आमदारांची संख्याही विधिमंडळात पुन्हा कमीच असणार हे निश्चित आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विदारक सत्य पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

कोणत्या पक्षाकडून किती महिला उमेदवार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती आणि महाविकासआघाडी या दोन आघाड्या राजकीय पक्षांना एकत्र घेऊन परस्परांविरोधात मैदानात आहेत. जनतेचा कौल आजमावत आहेत. या आघाड्यांमध्ये शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि काँग्रेस हे मविआकडून तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (AP) हे महायुतीकडून स्पर्धेत आहेत. या दोन्ही युती आणि आघाडीने मिळून 55 महिला उमेदवार आहेत. त्यापैकी MVA कडून 29 आणि महायुतीकडून 26 उमेवदवार आहेत. बाकीचे महिला उमेदवार हे वंचित बहुजन आघाडी (VBA) किंवा अपक्षांकडून आहेत. (हेही वाचा, Wada Police Seize Rs 3.70 Crore: पालघर जिल्ह्यात 3.70 कोटी रुपयांची रोकड जप्त; वाडा पोलिसांची कारवाई)

कोणत्या मतदारसंघांमध्ये अधिक महिला उमेदवार?

धक्कादायक म्हणजे, महिला सक्षमीकरण आणि विधिमंडळांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण अनिवार्य करणारे महिला आरक्षण विधेयक नुकत्याच मंजूर झाल्यानंतरही ही निराशाजनक आकडेवारी कायम आहे. तथापि, जनगणना-आधारित जागा परिसीमा प्रलंबित असल्याने हे विधेयक 2029 पर्यंतच लागू होण्याची अपेक्षा आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील पार्वती मतदारसंघात सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व आहे. ज्यात सात महिला उमेदवारांचा समावेश आहे. एमव्हीएच्या अश्विनी जगतप आणि महायुतीच्या माधुरी मिसाळ रिंगणात आहेत. उल्लेखनीय महिला सहभाग असलेल्या इतर मतदारसंघांमध्ये औरंगाबाद पूर्व (6 महिला उमेदवार), जलगाव शहर, नागपूर दक्षिण, देवलाली आणि कुर्ला यांचा समावेश आहे, ज्यात प्रत्येकी पाच महिला आहेत. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections: मुंबईकरांसाठी खुशखबर! शाईचे बोट दाखवल्यानंतर मतदारांना रेस्टॉरंट्स, मल्टिप्लेक्स, किरकोळ विक्रेत्यांकडून मिळणार भरघोस सवलत)

राजकारणामधील महिलांचा घटता सहभाग हा मुद्दा नेहमीच चिंतेचा विषय आहे. आज भारतामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी, जमीनीवरील हकीकत वेगळीच आहे. आजही विविध क्षेत्रांमध्ये अनेक महिला वरिष्ठ पदांवर कार्यरत असल्या तरी, त्यांचा टक्का आजही कमीच आहे. त्यामुळे केवळ राजकारणच नव्हे तर इतर सर्वच क्षेत्रातील महिलांचा टक्का प्रचंड वाढायला हवा, अशी मागणी वाढत आहे.