Maharashtra Assembly Elections: शाईचे बोट दाखवल्यानंतर मतदारांना मुंबईतील निवडक दुकाने, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल, अशी घोषणा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मतदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम व्यापारी, मल्टिप्लेक्स मालक आणि रेस्टॉरंट मालकांच्या संघटनांशी चर्चा करून हाती घेण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. निवडणूक आयोगाकडून मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. आज या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. भूषण गगराणी यांनी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन, असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट्स आणि इतर काही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत 31 ऑक्टोबर रोजी बैठक घेतली. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सवलत देण्याचे मान्य केले. मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, स्टर्लिंग, मुक्ता, मूव्हीमॅक्स आणि मुव्ही टाईम यांनी शहरात 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान मतदारांना 20 टक्के सूट देण्याचे मान्य केले आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’; जाणून घ्या मिळणाऱ्या सुविधा)

मतदारांना रेस्टॉरंट्स, मल्टिप्लेक्स, किरकोळ विक्रेत्यांकडून मिळणार सवलत-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)