Kalyan: कल्याण येथील गांधारी परिसरात महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला, पतीनेच हत्या केल्याची पोलिसांना संशय; तपास सुरु
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

कल्याण (Kalyan) येथील गांधारी (Gandhari) परिसरात सोमवारी एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या (Woman stoned to death) अवस्थेत आढळून आला आहे. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच संबंधित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर मृत महिलेचा पती बेपत्ता असून त्यानेची ही हत्या केल्याची पोलिसांना संशय आहे. खडकपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लक्ष्मी मोहते असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मी मोहते यांचा मृतदेह आज सकाळी दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला होता. काही स्थानिकांनी लक्ष्मी मोहिते यांचा मृतदेह पाहिला आणि खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai Police च्या Khaki Studio कडून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेला संगीतमय सलामी (Watch Video)

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी मोहते या भिवंडीतील सावडगाव परिसरातील रहिवाशी आहेत. लक्ष्मी या कल्याणच्या गांधारी परिसरात गृहणी म्हणून काम करतात. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार म्हणाले की, " या घटनेपासून लक्ष्मीचा पती बेपत्ता आहे. त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.