Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये वाढ होत असून ही एक गंभीर बाब आहे. तसेच राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाही. मात्र नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवासुविधा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांवर उपचार डॉक्टर्स, नर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. तसेच रस्त्यांवर पोलीस गस्त घालून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करत आहेत. तरीही कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असून महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 26 रुग्ण आढळून आल्याने आकडा 661 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

शनिवारी मुंबईत कोरोनाचे नवे 52 रुग्ण आढळून आले होते. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना वारंवार स्वत:ची काळजी घेण्यासोबत घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात मुबलक मास्क आणि व्हेंटिलेटर्सची सोय असल्याची माहिती दिली आहे. देशभरातील कोरोना व्हायरसची संख्या पाहता महाराष्ट्रात ती सर्वाधिक आहे. मात्र आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा संख्येत वाढ झाली आहे.(डोंबिवली मधील शास्त्रीनगर रुग्णालयातून Quranatine केलेल्या रुग्णाचे पलायन)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. पण आता लॉकडाउन अजून वाढवायचा की नाही ते नागरिकांच्या हातात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी म्हटले आहे.