Mumbai Local: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई लोकलबाबत सकारात्मक संकेत; पाहा काय म्हणाले?
CM Uddhav Thackeray | (Photo Credits- Facebook)

कोरोना (Coronavirus) निर्बंध शिथिल झाले तरी सुरु न झालेली मुंबई लोकल (Mumbai Local) सर्वसामान्यांसाठी नेमकी खुली कधी होणार? याबाबत मोठी उत्सुकता आहे. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयातही गेले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुंबई लोकलबाबत सकारात्मक संकेत (Uddhav Thackeray On Mumbai Local Train) दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या जी पश्चिम कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (5 ऑगस्ट) झाले. या वेळी ते बोलत होते. सर्व परिस्थिती आणि त्याचे फायदेतोटे, दुष्परीणाम या सर्वांचा विचार करुन निर्णय घेण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कोरोना निर्बध शिथिल केले जाऊ शकतात त्या ठिकाणी तसा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई लोकलही लवकरच सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ज्या ठिकाणी निर्बंध शिथील झाले आहेत त्या ठिकाणी व्यवसाय सुरु करणयास परवागनी देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी निर्बंध शिथील नाहीत त्या ठिकाणी परवानगी नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी संयम सोडू नये. निर्बंद धिथील होताच त्या त्या ठिकाणी व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, Mumbai Local: लसीकरण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासासाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना काळात मुंबई महापालिकेने जे काम केले ते काम मॉडेल म्हणून पुढे आले. मुंबई मॉडेलचे सर्वत्र कौतुक झाल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. पालिका कर्मचाऱ्यांनी जे काही चांगले काम केले त्यामुळेच हे शक्य झाल्याचेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. धारावीसारख्या झोपडपट्टी परिसरात कोरोना आटोक्यात आणणे हे एक मोठे आव्हानात्मक काम होते. परंतू, या ठिकाणीही सेवेत कोणत्याही प्रकारे खंड न पडू देता पालिका कर्मचाऱ्यांनी हे काम जोरदारपणे केले. अनेक गोष्टी आगोदर मुंबईत होतात मग देशात होता, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी म्हटले.