Photo Credit- X

Singapore Airlines: सिंगापूर एअरलाइन्सने अलीकडेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा पगार बोनस(Singapore Airlines Bonus) म्हणून बक्षीस देण्याची घोषणा केली आहे की ती आपल्या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांच्या पगाराच्या बोनससह बक्षीस देईल,एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार. कंपनीने बुधवारी 15 मे रोजी घोषणा करत सांगितले की त्यांनी 2023-2024 या आर्थिक वर्षात विक्रमी 1.98 अब्ज डॉलर नफा (Airlines Profit)कमावला आहे. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरलाइन अवॉर्ड्सने गेल्या वर्षी सिंगापूर एअरलाइन्स (Singapore Airlines) कंपनीला जगातील सर्वोत्कृष्ट एअरलाइनचा पुरस्कार दिला होता. उल्लेखनीयबाब म्हणजे, एअरलाइनने त्यांच्या 23 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा सर्वोच्च पारितोषिक जिंकले आहे.(हेही वाचा:Singapore New Covid Wave: सिंगापूरमध्ये नवीन करोनाची लाट, लोकांना मास्क घालण्याचा सरकारने दिला सल्ला)

कामगारांत्या संख्येबाबत बोलायचे झाले तर, 170 पेक्षा जास्त वेगवेगळ्या राष्ट्रीयतेचे कर्मचारी आहेत. त्याशिवाय, 84 देशांमध्ये ते विखुरलेले आहेत.सलग दुसऱ्या वर्षी एअरलाइन्सला घसघशीत नफा झाल्याने एअरलाइन्सने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षाच्या कमाईपेक्षा यंदाच्या वर्षी कंपनीने अधिक नफा कमावला आहे. त्यामुळेच कंपनीने नफ्यामधून 6.65 महिन्यांचा पगार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिला. साथीच्या काळातील भरपाई म्हणून 1.5 महिन्यांचा अतिरिक्त पगार प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात आला आहे. यावर अद्याप सिंगापूर एअरलाइन्सकडून मात्र, कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

16,530 कोटींहून अधिक नफा

सिंगापूर एअरलाइन्सने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मागील वर्षापेक्षा 24 टक्के अधिक नफा कमवला आहे. कंपनीने कमवलेला नफा हा 2.67 बिलियन सिंगापूर डॉलर्स इतका आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार हा नफा 16530 कोटींहून अधिक रुपयांचा आहे. साथीच्या आजारानंतर परिस्थिती सर्वसामान्य होत असताना विमान प्रवासाची मागणी वाढत आहे. त्यामुळेच कंपनीला सातत्याने नफा होत आहे. कंपनीच्या कार्गो सेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यामध्ये सिंगापूर एअरलाइन्सची 97 टक्क्यांहून अधिक विमानं पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करत होती.