Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
24 minutes ago

Viral Video: रस्त्यावर कुत्र्याने केला जबरदस्त अभिनय, व्हिडीओ पाहून व्हाल चकित

कुत्रा हा एकमेव प्राणी आहे ज्याच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले जाते. याच कारणामुळे बहुतेक लोक कुत्र्यांना आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की, हे गोंडस प्राणी देखील अप्रतिम अभिनय करतात. तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही कुत्र्याचा अभिनय पाहू शकता.

व्हायरल Shreya Varke | May 19, 2024 11:14 AM IST
A+
A-
Viral Video

कुत्रा हा एकमेव प्राणी आहे ज्याच्या निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले जाते. याच कारणामुळे बहुतेक लोक कुत्र्यांना आपल्या घरात पाळीव प्राणी म्हणून ठेवतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की, हे गोंडस प्राणी देखील अप्रतिम अभिनय करतात. तुमचा यावर विश्वास बसत नसेल तर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही कुत्र्याचा अभिनय पाहू शकता. या नाटकी कुत्र्याचा अभिनय इतका अप्रतिम आहे की, तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ वेगाने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ X वर @ThebestFigen नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून या व्हिडिओला 12.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले - तो एक उत्तम नाटककार आहे, तर दुसऱ्याने लिहिले - हा अभिनय पाहिल्यानंतर मजा आली.

पाहा पोस्ट:

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा रस्त्यावर अशा पद्धतीने चालत आहे की, कोणालाही या प्राण्याची कीव येईल. कुत्र्याला पाहताच असे दिसते की, त्याचे मागचे दोन्ही पाय तुटले आहेत, त्यामुळे त्याला या अवस्थेत पाहून एक व्यक्ती आपली गाडी थांबवतो आणि त्याच्या मदतीला येतो, परंतु ती व्यक्ती त्याच्या जवळ जाताच कुत्रा पूर्णपणे सामान्य होतो. आणि चारही पायांवर चालायला लागतो.


Show Full Article Share Now