Uddhav Thackeray On PM Modi: 'पुन्हा कधीही पंतप्रधान मोदींशी जुळवून घेणार नाही'; उद्धव ठाकरे यांचा दावा
Uddhav Thackeray, PM Modi (FB)

Uddhav Thackeray On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्याशी कधीही जुळवून घेणार नाही, असा दावा शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वासघाती आहेत आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) त्यांची पराजय होईल, असंही म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि शिवसेनेला (यूबीटी) काँग्रेसमध्ये विलीन होऊन मरण्याऐवजी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा सल्ला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या मनात महाराष्ट्राविषयी राग आहे, म्हणूनच त्यांनी संस्था आणि गुंतवणूक प्रकल्प इतर राज्यात हलवले आहेत. मात्र, या लोकसभा निवडणुकांनंतर मोदींची हुकूमशाही राजवट संपेल. ही माझी हमी आहे. केंद्रात भारत आघाडी सरकार स्थापन करेल आणि त्यानंतर महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल याची मला खात्री आहे. (हेही वाचा -Shirur Lokssbha Election: शिरूर मतदान केंद्रावरील भोंगळ कारभार उघडकीस, राजकिय कार्यकर्त्यांनी आचारसंहितेच उल्लघंन केल्याने अमोल कोल्हे भडकले (Watch Video))

या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा महाविकास आघाडी (एमव्हीए) सत्तेवर येईल, असादेखील दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यानंतर आम्ही BMC मधील घोटाळे आणि BMC च्या मुदत ठेवी मोडून निधीचा गैरवापर यासह भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देऊ. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला ‘गजनी’ सरकार म्हटलं आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये जे आश्वासन दिले होते, ते 2019 मध्ये ते विसरले आणि 2019 मध्ये जे आश्वासन दिले होते ते, आता विसरले आहेत, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. (हेही वाचा - Sharad Pawar on Narendra Modi: आजवरच्या सर्व पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदी यांची भाषा लज्जास्पद: शरद पवार)

तथापी, रविवारी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नावर आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे देशाच्या पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारची भाषा वापरतात, ती भाषा पाहता जुळवून घेणार नाही, असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.