Shirur Loksabha Election 2024 PC TWITER

Shirur Lokssbha Election: राज्यात ठिकठिकाणी मतदान सुरु आहे. याबाबत राजकीय नेत्यांकडून अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहे. त्यात शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या X च्या अधिकृत अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत महायुतीचा एक बूथ कार्यकर्ता त्यांच्या उमेदवार शिवाजीराव आढाळराव यांना पाठिंबा देण्यासाठी मतदारांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ पुणे येथील शिरूर लोकसभा मतदारसंघातील मांजरी येथील आहे. या घटनेनंतर शिरूर मतदान केंद्रावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. (हेही वाचा- मतदान केंद्रांच्या 100 मीटर आवारात मोबाईल फोनवर बंदी; पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती )

मिळालेल्या माहितीनुसार, शरचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या X अकांऊटवरून या व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये असं लिहले आहे की, आता शिरूर लोकसभा मतदारसंघातही थेट मतदान केंद्रातच महायुतीचा बुथ सदस्य हा त्यांच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन उपस्थित मतदारांना करत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या या लोकशाहीविरोधी वृत्तीला मतदार राजा मुळीच थारा देणार नाही. शिरूर लोकसभेच्या मांजरी येथील बुथवर घडलेल्या या व्हिडीओची योग्य शहानिशा करून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई व्हावी!

पाहा ट्वीट

शिरूर लोकसभा जागेसाठी राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार अमोल कोल्हे यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पोस्ट केलेल्या व्हिडिओवर त्यांनी लिहले की, सत्ताधारी पक्षाचे पोलिंग एजंट बनून मतदान केंद्रावर मनमानी कारभार करत आहेत. व्हिडिओत मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आचार संहितेचे उल्लघंन करणाऱ्या राजकिय नेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.