Pune Lok Sabha Election: मतदान केंद्रांच्या 100 मीटर आवारात मोबाईल फोनवर बंदी; पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती (Watch Video)
Photo Credit -X

Pune Lok Sabha Election: १३ तारखेला पुणे, शिरूर, मावळ, तालुक्यात मतदान होत आहे. मतदान येग्यरीतीने पारदर्शकपणे पार पडावी यासाठी आवश्यक ती उपाययोजना प्रशासनाने केली आहे. मतदान केंद्रावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाने काही कसर ठेवली नाही. मतरांनी केलेल्या मतदानाची गुप्तता मतदान पाळणं फार महत्त्वाचे असते, मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचे फोटो काढणे किंवा व्हिडीओ शूट करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या १०० मीटर आवारात मतदाराला त्याचा फोन नेता येणार नाही. त्यामुळे मदाराने त्याचा फोन घरीच ठेवावा किंवा वाहनात ठेवाव असे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले आहे.