शरद पवार (harad Pawar) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी यांच्या भाषणाती पातळी अत्यंत खालच्या दर्जाची असते. आम्ही आमच्याराजकीय आयुष्यामध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी ते मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वांची भाषणे ऐकली आहेत. पण आतापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांपैकी नरेंद्र मोदी यांच्या भाषा लाजिरवाणी असते, असा थेट प्रहार पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SS) पक्षाचे शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार चाकण येथे बोलत होते.
जगभरातील देशांना भारतीय लोकशाहीबद्दल आदर
भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. जगभरातील देशांना भारतीय लोकशाहीबद्दल आदर आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लोकशाही संपुष्टात आणू पाहात आहेत. मोदी आणि त्यांचे सहकारी हे या देशातील लोकशाही संपवून त्यावर हुकुमशाहीचे संकट आणू पाहात असल्याचा घणाघात शरद पवार यांनी केला. पुढ बोलताना ते म्हणाले, देशातील एकाधिकारशाहीला आव्हान देण्यासाठी अमोल कोल्हे यांच्यासारखे नेते संसदेत असायलाच पाहिजेत. (हेही वाचा, PM Narendra Modi यांनी विलिनीकरणावरून Sharad Pawar यांना भाजपामध्ये येण्याच्या ऑफरला पहा काय दिले 'जशास तसे उत्तर')
हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात
नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी 'अब की बार 400 पार' चा नारा देत आहे. त्यांना इतके बहुमत हे देशाची घटना बदलण्यासाठी हवे आहे. याबाबत भाजपच्या एका मंत्र्यांनी तसे विधानही केले होते. इतरही अनेक भाजप नेते देशाची घटना बदलण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी 400 पारचे अवाहन करत आहेत. याचाच अर्थ असा की, या मंडळींचा आमच्या मूलभूत अधिकारांवरच गदा आणण्याचा डाव आहे. तसे घडले तर या हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात येईल, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, PM Modi vs INDI Alliance: नंदूरबारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पुन्हा हल्ला; 'फेक शिवसेना मला जीवंत गाडण्याची भाषा करते' )
नरेंद्र मोदी यांची भाषा वेगळी आणि लज्जास्पद
आम्ही आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांची भाषणे ऐकली आहेत. या सर्वांमध्ये नरेंद्र मोदी यांची भाषा वेगळी आणि लज्जास्पद असते. मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. येथे ज्या गोष्टी नाहीत किंवा घडलेल्याच नाहीत याबाबत ते बोलतात. पण टीका केल्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, असेही शरद पवार म्हणाले.
राहुल गांधी हे नव्या पिढीचे नेते आहेत. त्यांनी संपूर्ण देश पायी फिरला आहे. लोकांशी संवाद साधून त्यांनी त्यांची व्यथा समजून घेतली आहे. देशातील खूप कमी नेत्यांनी अशी कृती केली आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र त्यांची टींगल करत आहेत. इतकेच नव्हे तर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी त्याग केला आहे, त्या त्यागाबद्दल आदर ठेवण्याऐवजी मोदी त्यांच्याबाबत वेडेवाकडे बोलताना दिसतात, असेही शरद पवार म्हणाले.