SRH Beat PBKS, IPL 2024 69th Match: विजयासह हैदराबादने गुणतालिकेत घेतली झेप, टॉप-2 मध्ये मिळवले स्थान

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पीबीकेएसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगच्या (71) अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने 5 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

SRH Beat PBKS, IPL 2024 69th Match: विजयासह हैदराबादने गुणतालिकेत घेतली झेप, टॉप-2 मध्ये मिळवले स्थान

SRH Beat PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 69 व्या (IPL 2024) सामन्यात रविवारी सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 4 विकेटने पराभव (SRH Beat PBKS) केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पीबीकेएसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगच्या (71) अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने 5 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. तुफानी खेळी खेळणारा अभिषेक शर्मा विजयाचा हिरो ठरला. या विजयासह एसआरएचने गुणतालिकेतही झेप घेतली आहे. संघाने साखळी टप्प्यातील सर्व 14 पैकी 8 सामने जिंकले आहेत. 17 गुणांसह संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. 13 पैकी 9 विजय आणि 18 गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स अजूनही गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स 13 पैकी 8 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 14 पैकी 7 विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2024 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).