Akola Accident: अकोल्यात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 तरुणींचा मृत्यू
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी असून त्यास तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दुचाकीवरुन चारजण प्रवास करत होते, मात्र तेल्हारा-बेलखेड मार्गवर आल्यानंतर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.   (हेही वाचा - Kalyani Nagar Pune Accident: पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल)

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात भरधाव येणाऱ्या ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मतदकार्य सुरू केले होते.  अपघातील मृतांमध्ये दोन तरुणी आणि एका महिलेचा समावेश आहे. तर, जखमीला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेतील मृत दोन्ही तरूणी एकाच कुटूंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाट्यावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना भीषण अपघात झाला, शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटी झाला. अरुंद रस्त्यावरुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् शेजारुन जात असलेल्या कारवर हा तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कोसळला.