File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

दरवर्षीच मार्च (March) ते जून (June) या पाच महिन्या दरम्यान मुंबईकरांना (Mumbai) पाणी कपातीच्या समस्येला पुढे जावं लागतं. महापालिका (BMC) उपाय योजना करते तरीही काही प्रमाणात मुंबईतील नागरीकांना ही समस्या पेलावी लागते. ज्यावर्षी उपनगरात पाऊस मुभलक झाला तेव्हा ठीक पण उपनगरात आवश्यक तेवढा पाऊस न पडल्यास मुंबईकरांना पाणी कपातीच्या समस्येला तोंड द्यावं लागत. कारण उपनगरातील जलसाठ्यामधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो पण उपनगरात पाऊसच पडला नाही तर मात्र ठण ठण गोपालाचं. पाणी कपातीच्या समस्येवर एक उपाय म्हणून मुंबई महापालिका एक नवा प्रयोग करणार आहे. ज्यात मुंबईतील सांडपाणी महत्वाची भुमिका बजावणार आहे.

 

मुंबई महापालिकेचा (BMC) अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यादाचं करत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य करण्याचा हा उपक्रम आहे. यासंबंधीत निविदेची जाहिरात (Advertisement) मुंबई महापालिकेने दिली आहे.  तरी या प्रयोगासाठी 250 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती मिळत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्याव्यतिरिक्त कामासाठी उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाची ही नवी संकल्पना आहे.(हे ही वाचा:- Maharashtra Rain: मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी, राज्यातील विविध भागात सरी बरसण्याचा अंदाज)

 

वाढत्या लोकसंख्येमुळे (Population) मुंबईला (Mumbai) दररोज जवळपास 4 हजार दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज भासण्याची शक्यता आहे. महापालिकेने दिलेल्या जाहिरातीप्रमाणे जी कंपनी हा प्रोजेक्ट (Project) घेईल त्या कंपनीवर पुढील 15 वर्षे संबंधीत कामाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी असेल. पुढील 15 वर्षे त्या ट्रीटमेंट प्लाॅटची (Plant) देखभाल, दुरुस्ती (Repair) करण्याची सर्वोसर्वी जबाबदारी संबंधित कंपनीची असेल, अशी भुमिका महापालिकेने स्पष्ट केली आहे.