Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

गेले काही दिवसांपासून वरुण राजा शांत असला तरी आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Come Back) करत मुंबईसह (Mumbai) उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत मध्यरात्री पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. उपनगरातही पावसाने सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. मुंबईतील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील पावसाचा प्रभाव मुंबईतील ट्राफीकवर (Mumbai Traffic) देखील दिसून येत आहे. तरी मुंबईतील पाऊस (Mumbai Rains)  आणि गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभुमिवर मुंबई लोकलच्या (Mumbai Local) तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) नाही. मुंबई प्रमाणेचं मराठवाडा (Marathwada), उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) विविध जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात हवामान विभागाकडून अलर्ट (Alert) जारी करण्यात आला आहे.

 

राज्यभरात विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच ठाणे (Thane), पालघर (Palghar), औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna), नाशिक (Nashik), धुळे (Dhule), अहमदनगर (Ahmednagar), पुणे (Pune), लातूर (Latur), सोलापूर (Solapur) आणि विदर्भातील (Vidarbha) विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यभरात (Maharashtra) पुन्हा पावसाने कमबॅक (Come Back) केलं आहे. मराठवाड्यासह (Marathwada) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाची जोरदार बॅटींग (Bating) बघायला मिळत आहे. (हे ही वाचा:- Ganeshotsav 2022: मुंबईच्या बेस्ट मधून प्रवास करणारा गणपती बाप्पा, प्रत्येक मुंबईकराच्या मनाला भावणारा हा देखावा; पहा फोटो)

 

हवामान विभागाकडून (India Metrological Department) देण्यात आलेल्या माहितीनुसार आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नदीकाठच्या गावांना विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर कोकणातील काही भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.