Photo Credit- Pixabay

ला निना सामान्यत: पावसाळ्याच्या ( monsoon)शेवटी येते आणि त्यामुळे तापमानात तीव्र घट होते. अनेकदा वाढलेल्या पावसाचा परिणाम पुढच्या ऋतूवर म्हणजेच हिवाळ्यावर होतो. ज्यामुळे हिवाळ्यात वातावरण अधिक थंड होऊ शकते. ला निना(La Nina) काळात पूर्वेकडील वारे पश्चिमेकडे ढकलले जातता. ज्यामुळे महासागराची पृष्ठभाग थंड होतो. विशेषत: हे वातावरण पॅसिफिकमध्ये अनुभवायला मिळते. (हेही वाचा: Cabinet Decision For Kharif Season: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खरीप हंगामासाठी केंद्राने 14 पिकांची MSP वाढवली, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय)

उशीरापर्यंत राहणाऱ्या मान्सूनचा फायदा म्हणजे जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकूण राहू शकतो. जे रब्बी पिकांसाठी जीवनदायक ठरू शकते. याव्यतिरिक्त, खरीप पिके मुबलक पावसामुळे वाढतील. त्यांची गुणवत्ता आणि उत्पन्न वाढवेल. तथापि, या जास्त ओलाव्यामुळे लवकर काढणीसाठी आलेल्या खरीप पिकांसाठी संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. कापणीची प्रक्रिया अडचणीची होते आणि त्यानुळे काढणीला उशीर होऊ शकतो. (Crop Insurance For Kharif- 2024: खरीप- 2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात; अवघ्या एक रुपयात मिळणार लाभ, जाणून घ्या कुठे भराल अर्ज)

ला नीनाचा प्रभाव हिवाळा ऋतूतील महिन्यांपर्यंत देखील वाढू शकतो, संभाव्यत: वेगळ्या ऋतूतही पाऊस पडू शकतो. ज्यामुळे रब्बी पिकांना आणखी फायदा होईल. कडक हिवाळ्यामुले दंव निर्माण होतात. जे रब्बी पिकांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरुक राहणे आवश्यक आहे.