काळीज चिरुन जाणारा आक्रोश, कानठळ्या बसवणारा आवाज आणि दहशतवाद्यांचे ते कृर कृत्य. आज दहा वर्षे झाली त्या दुर्दैवी घटनेला. कधीच न थांबणारी मुंबई ठप्प झाली. मुंबईच्या इतिहासातला हा सर्वात भयावह आणि तितकाच क्रूर ठरलेला दहशतवादी हल्ला. ही घटना घडली तो दिवस होता २६ नोव्हेंबर २००८. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हॉटेल ताज आणि ट्राइडेंटवर तसेच, छत्रपती शिवाजी टर्मिनसवर एके-47 आणि अत्मघातकी शस्त्रांनी हल्ला केला. कामा इस्पितळ (रुग्णालय) सुद्धा या हल्ल्यातून सुटले नाही. या हल्ल्याला मुंबई पोलिस आणि भारतीय सुरक्षा जवानांनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. सर्व दहशतवाद्यांचा खत्मा केला. एकाला जिवंत पकडला. पण, यात देशाचे ५ वीर मोहरे शहीद झाले. भारताचे असली हिरो म्हणून इतिहास त्यांची नक्की नोंद घेईल. २६/११च्या हल्ल्याच्या आठवणीत या पाच मोहऱ्यांविषयी..
हेमंत करकरे (मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख)
मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे त्या दिवशी (२६ नोव्हेंबर २०१८) आपल्या घरी रात्रीचे भोजन घेत होते. ते जेवन करत असतानाच त्यांचा फोन वाजला. फोन क्राईम ब्रांच ऑफिसमधून होता. माहिती धक्कादायक आणि अतिशय वेदनादाई होती. जेवत्या ताटावरुन हेमंत करकरे उठले. कर्तव्यावर निघाले. एसीपी अशोक कामटे, इन्स्पेक्टर विजय साळस्कर यांच्यासोबत खिंड लढवली. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. कामा हॉस्पिटल बाहेर दहशतवादी अजमल कसाब आणि इस्माईल खान यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हेमंत करकरे शहीद झाले. त्यांनी मृत्यूपश्चात अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. करकरे यांची महत्त्वाची ओळख म्हणजे मुंबई बॉम्बस्फोट आणि मालेगा बॉम्बस्फोट याच्या चौकशीत करकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
तुकाराम अंबोळे (सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलीस)
तुकाराम अंबोळे हे मुंबई पोलीस दलातील एक धाडसी अधिकारी होते. दहशतवादी अजमल कसाब गोळीबार करत होता. अंबोळे यांनी जीवाचा विचार न करता अजमलवर झडप घातली आणि त्याला जखडून ठेवले. या झटापटीत कसाबच्या बंदीकीतून सुटलेल्या काही गोळ्या अंबोळे यांना लागल्या. यात ते शहीद झाले. अंबोळे यांना अशोक चक्र देऊन मरणोत्तर गौरविण्यात आले.
अशोक कामटे (अॅडिशनल पोलिस कमिशनर)
मुंबईवर दहशतवादी हल्ला करत होते तेव्हा, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे आणि अशोक कामठे हे सोबतच होते. ते दहशतवाद्यांचा निकराने प्रतिकार करत होते. ही घटना कामा इस्पितळ (रुग्णालय) परिसरात घडली. दहशतवादी अस्माईल खान याने कामठे यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी कामठे यांच्या डोक्यात घुसली. पण, जखमी आवस्थेतही कामठे यांनी गोळी झाडून शत्रूचा खत्मा केलाच.
विजय साळस्कर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), (एन्काउंटर स्पेशालिस्ट)
मुंबईतील गॅंगस्टर आणि थेट अंडरवर्ल्डलाही हादरा देणारे हे खळबळजनक नाव. एन्काउंटर स्पेशालिस्ट ही त्याची कास ओळख. मुंबई पोलीस दलात ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर होते. कामा इस्पितळ (रुग्णालय) बाहेर दहशदवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हेमंत करकरे, अशोक कामठे यांच्यासोबत विजय साळस्करही शहीद झाले. त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.(हेही वाचा, 26/11 Mumbai Terror Attack : तीन दिवस चाललेल्या या हल्ल्याचा असा होता घटनाक्रम)
मेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी
२६/११ चा हल्ला झाला तेव्हा, मेजर संदीप अन्नीकृष्णन हे मिशन ऑपरेशन ब्लॅक टारनेडोचे नेतृत्व करत होते. ते ५१एसएजीचे कमांडर होते. ताज हॉटेलवर हल्ला केलेल्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांच्यावर पाठिमागून हल्ला झाला. ते घटनास्थळीच शहीद झाले. त्यानाही मरोणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.