Sex Tips: सेक्स दरम्यान चुकूनही कधी 'या' गोष्टींचा ल्यूब म्हणून करु नका वापर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Max Pixel)

अनेक जोडप्यांना सेक्स (Sex) दरम्यान योनि मार्गाला कोरडेपणा येणे, इंटरकोर्स दरम्यान जागा सुकणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्यांना सेक्सचा आनंद घेता येत नाही. अशा परिस्थितीत ल्यूबचा अनेक जोडपी वापर करतात. मात्र ज्यांच्याकडे ल्यूब (Lube) नसतील ते झटपट योनि मार्गाला ओलेपणा निर्माण करण्यासाठी अनेक सोप्या पद्धतींचा वापर करतात. ज्यामुळे तुमच्या योनिमार्गाद्वारे जंतु पसरण्याची शक्यता असते. ज्याचा तुमच्या शरीरावर विपरित परिणामही होऊ शकतो. त्यामुळे सेक्स दरम्यान योनिमार्ग ओलसर करण्यासाठी ल्यूबचाच वापर करा असा सल्ला दिला जातो.

जेव्हा महिला सेक्स दरम्यान उत्तेजित होते तेव्हा तिच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे तिला ऑर्गेज्मपर्यंत (Orgasm) पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठी पुरुष वा स्त्री अनेकदा घाई करतात आणि ल्यूबच्या ऐवजी काही सोप्या पद्धतींचा वापर करायला जातात. अशा गोष्टींचा ल्यूब म्हणून कधीच उपयोग करु नये. पाहूयात कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात.

  • सेक्स दरम्यान अनेकदा आपल्या थुंकीचा वापर ल्यूब म्हणून केला जातो. योनिला आलेले कोरडेपण दूर करण्यासाठी थुंकी लावतात. यामुळे STD पसरण्याची शक्यता असते. जी थुंकीमुळे तुमच्या योनिपर्यंत पोहोचू शकते.हेदेखील वाचा- Sex Tips For Women: सेक्स दरम्यान महिलांनी टाळा 'या' गोष्टी नाहीतर पुरुष जोडीदार तुमच्यावर होतील नाराज
  • बेबी ऑईल ल्यूब म्हणून वापरले जाते. तुमच्या योनीत यीस्ट संक्रमण होण्याची शक्यता आणखीनच बळावते. हा तुमच्या कंडोमची प्रभावशीलता देखील कमी करु शकतो.
  • व्हॅसलिनचा वापर ल्यूब म्हणून करु नये. कारण हे पेट्रोलियमवर आधारित आहे. जो तुमच्या योनीत संक्रमणाचे कारण बनू शकतो.
  • नारळाचे तेल कंडोममध्ये लेटेक्स खराब करू शकतात. ज्यामुळे कंडोम सेक्स दरम्यान फाटण्याची शक्यता असते.
  • ऑलिव्ह ऑइल कंडोममधल्या लेटेक्ससह छेडछाड करु शकतात. त्यामुळे हे तेल तुमच्या योनिमार्गाला लावणे देखील धोक्याचे आहे.

सेक्सदरम्यान ऑर्गेज्मचा आनंद मिळावा यासाठी झटपट उपाय म्हणून वर दिलेले प्रकार अनेक जोडपी सेक्स दरम्यान करतात. मात्र त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टी शक्यतो टाळून सुरक्षित अशा ल्यूबचा वापर करणे हितावह राहील. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा देखील सल्ला घ्या.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)