Relationship Or Flirting: साधारणतः कोणतीही प्रेमकथा घ्या त्यात मुलाने कसं आपल्या प्रेयसीचा जुलुम सहन करुन तिचे नखरे उचलले आहेत याचाच पाढा वाचुन दाखवलेला असतो पण असे कष्ट मुलींनाही घ्यावे लागतात हे तुम्ही जाणता का? नसेलच. अनेकदा आपला एखादं मित्र आपल्याला आवडत असतो, किंंबहुना तो ही आपल्याशी अगदी दिलखुलास गप्पा मारतो, तुम्ही तासनतास बोलता, तो मजेत तुमच्याशी फ्लर्ट सुद्धा करतो पण या सगळ्याचा नेमका अर्थ काय, किंंबहुना हे फक्त मैत्रीचं नातं आहे की पुढे जायची शक्यता आहे याचं उत्तर काही कळत नाही. अशावेळी काय करावंं? थेट जाउन विचारावंं का? खरतंर तसं करायलाही काही हरकत नाही पण त्याआधी थोडा गृहपाठ नक्की करुन जा. आपल्याशी फ्लर्ट करणारा मुलगा आपल्यावर प्रेम करतो का किंंवा त्याची तशी इच्छा आहे का हे कसं ओळखावंं हे पाहण्यासाठी त्याच्या वागण्याबोलण्यातील काही सोप्प्या छोट्या छोट्या गोष्टींंच तुम्हाला निरिक्षण करायचं आहे. या गोष्टी खालीलप्रमाणे..
तो तुमच्या कडे लक्ष देतो का?
तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट सांंगता ती गोष्ट किंंवा तुम्ही त्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ते त्याच्या नक्की लक्षात राहते, त्यामुळे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तो किती ऐकतो आणि लक्षात ठेवतो हे तपासुन पाहा.
तो तुमच्याशी किती संपर्कात आहे?
यात थोडी मते वेगळी असली तरी कोणीही व्यक्ती जर का तुमच्या प्रेमात असेल तर निदान एक दोन दिवसात त्याचे तुमचे बोलणे होतेच. त्यामुळे किती वेळा कॉल वर किंंवा मॅसेज मध्ये बोलणंं होतंं हे बघा.
तुमचं मॅसेज वर बोलणंं कसंय?
जसं की आपण पाहिलं की तो व्यक्ती तुमच्यात इंटरेस्ट ठेवणारा असेल तर तुमच्यात संपर्क होत राहीलच, हा संपर्क मॅसेज मधुन होत असल्यास कशाप्रकारचे मॅसेज केले जातात हे बघा. मॅसेज फक्त गूड मॉर्निंग आणि गूड नाईट, जेवलीस का, इतकेच नसावेत. तसेच आणखीन एक मुद्दा म्हणजे अनेकदा सेक्स्टिंगचा प्रयत्न होतो. तुम्ही कम्फर्टेबल असाल तर हरकत नाही पण नसाल तर तसं कळवा आणि तरीही का समोरुन हे प्रकार थांंबले नाहीत तर लगेच बाजुला व्हा.
तो तुम्हाला स्वतःबद्दल किती सांंगतो?
अनेकदा मुलींंना असं वाटतंं की तो आपलं ऐकुन घेतो म्हणजे तो बेस्ट पण त्यासोबतच तो तुम्हाला स्वतःच्या किती जवळचं मानतो हे ही पाहणंं आवश्यक आहे त्यामुळे तुम्हीही कधीकधी ऐकणारी भुमिका घ्या, तो स्वतःबद्दल किती सांंगतो हे पाहा.
तो तुमच्या Mental Health साठी चांंगला आहे का?
मुलींंनो हा प्रश्न आधी स्वतःला विचारा, तुमच्याशी फ्लर्ट करणे एक आणि तुम्हाला कनफ्युज करणे वेगळे.जर एखादा मुलगा जाणुन बुजुन तुम्हाला सतत मिक्स सिग्नल देत असेल तर फ्लर्टिंगच्या सीमा ठरवा. तुमच्या प्रेमात असणारा मुलगा कधीच तुम्हाला स्वतःच्या वागण्यातुन बुचकळ्यात टाकणार नाही.
याशिवाय तुम्ही स्वतः सुद्धा त्या व्यक्तीबाबत काय विचार करता हे लक्षात घ्या. केवळ तो आपल्याला हसवतो, गोड बोलतो, कौतुक करतो म्हणजे हाच माझा जीव की प्राण असं होत नाही त्यामुळे तुम्हाला ती व्यक्ती आवडते का हे आधी जाणुन घ्या.
(टीप- वरील लेख हा सर्वांंसाठी कॉमन सल्ला आहे, मात्र हेच निकष असतील असे गरजेचे नाही)