
Love & Relationships Advice: दोघांंच्या नात्यात तिसरा आला की समस्या येतातच. आता हा तिसरा व्यक्ती तुमच्या आवडीचा असला तर भलं नाहीतर त्या व्यक्तीमुळे पती/पत्नी किंंवा कपल्स मध्ये मुख्यतः भांंडणंं सुद्धा होऊ शकतात. यामुळेच काही प्रसंगामध्ये कपल्स तर अगदी फुट पडण्यापर्यंत वेगळे होतात. आता यात मुख्य मुद्दा काय तर तुम्हाला तुमचा पार्टनर किती महत्वाचा आहे, कारण का जर पार्टनर तुमच्यासाठी खास असेल तर त्याच्या/तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत चालवुन घ्यायला काहीच हरकत नाही, यामध्ये तुम्ही तुमच्या मनाविरुद्धंंच वागावंं असं काही गरजेचंं नाही प्रसंगी तुम्ही तुमच्या भावना सुद्धा खुलेपणाने व्यक्त करु शकता. जर का तुम्ही ही अशा नात्यात असाल जिथे तुमच्या पार्टनरचा बेस्ट फ्रेंड तुमच्यासाठी डोक्याला ताप ठरतोय पण तुम्हाला पार्टनरच्या भावना दुखवायच्या नाहीयेत अशा वेळी त्या तिसर्या व्यक्तीबाबत कसे वागावे याची आयडिया आम्ही शेअर करत आहोत नक्की वाचा..
मोकळेपणाने बोला, टोमणे मारु नका
तुम्ही जेव्हा पार्टनर आणि त्याचा/ची बेस्ट फ्रेंड यांंच्यासोबत असाल तेव्हा तुमचं मत लपवुन ठेवायची गरज नाही, तुम्ही सुद्धा मोकळेपणाने बोलु शकता. तुम्हाला जर बाजुला पडल्यासारखे वाटत असेल तर तसेही बोलुन दाखवा. पण टोमणे मारु नका यामुळे परिस्थिती विनाकारण बिघडु शकते.
आलिप्त सुद्धा राहु शकता
जर का तुम्ही पार्टनर त्याचा/ची बेस्ट फ्रेंड यांंच्यासोबत हॅंगआउट करायला तयार/इच्छित नसाल तर स्पष्ट सांंगायला हरकत नाही. तुमची स्पेस मागायला हरकत नाही मात्र त्यात समोरच्या च्या भावना दुखावणार नाहीत याकडे मात्र लक्ष द्या.
तिसर्या व्यक्तीच्या चांंगल्या गोष्टी पाहा
तुम्हाला तुमच्या नात्यातला तिसरा व्यक्ती अगदी आवडायलाच हवा असे गरजेचे नाही पण त्यातील चांंगल्या गोष्टी इग्नोर करु नका. त्यांंच्या चांंगल्या गोष्टींंचे कौतुकही करा.
पार्टनरला स्पॉट मध्ये ठेवु नका
चुकुनही अशी परिस्थिती निर्माण करु नका जिथे तुमच्या पार्टनरला तुमच्यात आणि त्याच्या बेस्ट फ्रेंडमध्ये निवड करावी लागेल. कारण या पकडीत अडकुन पार्टनरची कोंंडी होउ शकते. आणि त्याला/तिला त्रास देणे तुम्हाला आवडणार नाही ना?
जर बेस्ट फ्रेंड Opposite Geneder चा असेल तर..
जर का तुमच्या बॉयफ्रेंडची बेस्ट फ्रेंड मुलगी असेल किंंवा गर्लफ्रेंडचा बेस्ट फ्रेंड मुलगा असेल तर तुम्ही त्यांंच्या नात्याकडे कसे पाहता हे अत्यंंत महत्वाचे आहे. कारण जर का तुम्ही त्यांंच्यावर विनाकारण संंशय घेत राहिलात तर तुमची Insecurity दिसुन येईल. तुम्हाला जर खरंंच असा संंशय असेल तर सर्वात आधी तुमच्या पार्टनरशी बोला.
नातंं हे दोघांंचे असते पण त्यात तुमच्या आयुष्यातील अन्य नाती सुद्धा आपसुकच मिसळुन जातात, त्यामुळे एक जपताना दुसरा नाराज होईल असे वर्तन करु नका. असे झाल्यास आपली चुक मान्य करत जा.