बदललेली जीवनशैली, धावपळीचे जीवनमान याचा निश्चितच आरोग्यावर परिणाम होतो. कामाच्या डेडलाईन्स, ताण, घरच्या जबाबदाऱ्या या रहाटगाड्यात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. या सगळ्यात व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या अयोग्य वेळा-सवयी, बैठी जीवनशैली यामुळे स्थुलता वाढू लागते. परिणामी अनेक आजारांना निमंत्रण मिळते. ऑफिसच्या बिझी शेड्युलमध्येही फिट ठेवतील हे '5'अॅप्स !
पण वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करु नका. कारण त्यात या गंभीर आजारांचे मूळ दडलेले आहे. World Obesity Day निमित्त जाणून घेऊया स्थुलतेमुळे उद्भवणारे गंभीर आजार...
हृदयविकार आणि स्ट्रोक
वाढलेले वजन किंवा स्थुलता यामुळे उच्च रक्तदाबाचा आणि हाय कोलेस्ट्रॉलचा धोका अधिक वाढतो. या दोन्ही गोष्टी हृदयविकार आणि हार्ट स्ट्रोकला जबाबदार ठरतात. हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आरोग्यदायी खुराक
टाईप २ डायबेटिज
टाईप २ डायबेटिजने ग्रस्त असलेले बहुतांश लोकांचे वजन अधिक असते. पण अतिरिक्त वजन कमी केल्याने टाईप २ डायबेटिजचा धोका टाळता येऊ शकतो. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे टाईप 2 डायबेटिजचा धोका टाळता येईल.
कॅन्सर
स्थुलतेचा थेट संबंध कोलन कॅन्सर, ब्रेस्ट, गर्भाशयाचा कॅन्सर, किडनी, अन्ननलिकेच्या कॅन्सरशी असतो. तसंच अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, स्थुलतेमुळे पित्ताशय, ओव्हरीज आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सराचा धोका वाढतो.
पित्ताशयाचे आजार
पित्ताशयाचे आजार आणि पित्ताशयाचे खडे होणे हे त्रास वजन अधिक असलेल्या किंवा स्थूल असलेल्या लोकांमध्ये सामान्यपणे दिसून येतात. पण वजन कमी केल्यास या आजारांचा धोका टाळता येतो. 40 शी नंतर वजन कमी करण्यासाठी खास '5' टिप्स !