40 शी नंतर वजन कमी करण्यासाठी खास '5' टिप्स !
वेट लॉस (Photo Credit: Unsplash)

वजन कमी करणं हे तसं कठीणच. मग ते कोणत्याही वयात असो. पण ४० शी नंतर वजन कमी करणे अधिकच कठीण होवून बसते. पण तुम्ही जर मनावर घेतले तर ते शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला विशिष्ट्य प्लॅनिंगची गरज आहे. त्याचबरोबर नियमित व्यायाम, डाएट याची विशेष गरज असते. 40शी नंतर वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स... ऑफिसच्या बिझी शेड्युलमध्येही फिट ठेवतील हे '5'अॅप्स !

डॉक्टरांचा सल्ला घ्या

डायटिंग आणि व्यायाम सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वर्षातून एकदा आरोग्याच्या तपासण्या करुन घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने वर्कआऊट, डाएट करा. वजन कमी करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल.

मेनोपॉजनंतर

मेनोपॉजनंतर अनेकदा वजन वाढू लागते. हार्मोनल बदलामुळे हा परिणाम होऊ लागतो. याला आळा घालण्यासाठी दिनचर्येत काही बदल करावे लागतील. त्यामुळे हेल्दी खा आणि नियमित व्यायाम करा.

वेट ट्रेनिंग करा

योग्य पद्धतीने वेट ट्रेनिंग केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन देखील कमी होते. यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि जमलेली चरबी कमी होण्यास मदत होते.

आहारात बदल

प्रत्येकासाठी एकाच प्रकारचा डाएट प्लॅन करुन जमणार नाही. यासाठी तुम्हाला आहारात तुमच्या प्रकृतीनुसार काही बदल करावे लागतील. त्यामुळे त्यानुसार डाएट फॉलो करा.

खाण्या-पिण्याचे गणित सांभाळा

वजन कमी करण्याबरोबरच तुम्हाला शरीराच्या पोषणाची खूप गरज असते. यासाठी आहारात प्रोटीन्स, कार्ब्स, हेल्दी फॅट्स आदी पोषकघटकांचा समावेश करणे अत्यंत गरजचे आहे. त्याचबरोबर साखरेचे प्रमाण कमी करा आणि भरपूर पाणी प्या.