ऑफिसमधील काम ( Photo Credit: PIXABAY )

बदलेल्या जीवनशैलीत अधिकतर लोक तासंतास एकाच जागी बसून डेक्स जॉब करतात. दिवसभर कंम्प्युटरसमोर बसून राहिल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्याचबरोबर अनेक आजारांचा धोका वाढतो. धावपळीच्या, व्यस्त जीवनशैलीत आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. व्यायामासाठी वेळ मिळत नाही. खाण्यापिण्याची वेळा, सवयी बदलतात आणि आरोग्यावर परिणाम होऊ लागतो.

पण या व्यस्त जीवनशैलीत फिट राहण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ तर काढायलाच हवा. त्यासाठी तुमच्या मदतील ही काही अॅप्स आहेत. ज्याच्या वापराने तुम्ही अगदी फिट राहू शकाल. पाहुया कोणती आहेत ती ५ मोबाईल्स अॅप्स...

योगा स्टुडिओ माईंड अॅँड बॉडी (Yoga Studio: Mind & Body)

या अॅपमध्ये ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी सोपे ५ वर्कआऊड डिजाईन्स केले आहेत. जे तुम्ही वर्क टेबलवरुन बसून अगदी सहज करु शकतात. योगा स्टुडिओ अॅपमध्ये दिलेल्या वर्कआऊडच्या मदतीने तुम्ही कामाच्या अतिशय ताणातही अगदी फिट राहू शकता. हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोरवरुन फ्रीमध्ये डाऊनलोड करु शकता.

वर्कआऊड ट्रेनर बाय स्किंबल (Workout Trainer by Skimble)

फिट राहण्यासाठी हे अॅप हा अतिशय चांगला उपाय आहे. या अॅपमध्ये मसल्स मजबूत ठेवण्यासाठी आणि वेळेनुसार वर्कआऊडचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण प्रिमीयर एक्सरसाईजचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही फीस द्यावी लागेल. यातून तुम्हाला फिटनेस ट्रेनरकडून फिटनेस टिप्स मिळतील. याशिवाय ऑफिसच्या ब्रेक टाईममध्ये करण्यासाठी अनेक एक्सरसाईज सांगितल्या आहेत. हा अॅप आयओएस आणि अॅनरॉईडवर उपलब्ध आहे. हे १० सुपरफुड तुम्हाला नेहमी ठेवतील फिट; यांच्या सेवनाने विसरून जाल औषधांना

स्ट्रिडकिक (Stridekick)

ऑफिसच्या स्पर्धात्मक वातावरणात दुसऱ्यांपेक्षा पुढे राहण्याची इच्छा असल्यास त्याचबरोबर फिट राहण्यासाठी हा अॅप जरुर डाऊनलोड करा. हे एक पेडोमीटर अॅप आहे. यामध्ये फोनच्या एक्सीलरोमीटर किंवा फिटनेस ट्रॅकरसारख्या अॅप्पल वॉच अथवा फिटबिट्सचा वापर करुन तुमच्या स्टेप्स ट्रॅक करता येतात. ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा करायची असल्यास या अॅपचे मूवस्प्रिंग नावाचे ऑर्गेनाईजेशनल व्हर्जन देखील उपलब्ध आहे. जे तुम्ही आईओएस आणि अॅनरॉईड मोबालईमध्ये डाऊनलोड करु शकता.

फूडुकेट (Fooducate)

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती घराच्या अन्नाऐवजी बाहेरचे खाणे पसंत करतात किंवा नाईलाजाने त्यांना ते खावे लागते. अशावेळी बाजारात उपलब्ध असणाऱ्या खाण्यांच्या विविध पदार्थांऐवजी हेल्दी पर्याय कोणता हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या अॅपची मदत होईल. या अॅपमध्ये खाण्याच्या विविध पदार्थांचा डेटाबेस असतो. याशिवाय तुम्ही कोणत्याही फूड आयटमवरील बारकोड स्कॅन करुन या अॅपच्या मदतीने त्याच्या गुणवत्तेची माहिती करुन घेऊ शकता. हे अॅप तुम्ही ग्रहण केलेल्या कॅलरीजवरही लक्ष ठेवते. हे अॅप तुम्ही आईओएस आणि अॅनरॉईड मोबालईवर डाऊनलोड करु शकता.

इनसाईट टायमर (Insight Timer)

ऑफिसमध्ये काम करण्यासाठी शारीरिक नाही तर मानसिकरित्या देखील स्वस्थ राहण्याची गरज आहे. मेंदू शांत आणि स्वस्थ ठेवण्यासाठी देखील अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. ज्यातील अधिकतर अॅप्सचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही किंमत मोजावी लागेल. पण इनसाईट टायमर अगदी फ्री आहे. ज्याच्या मदतीने काही मिनिटातच तुम्ही स्ट्रेस फ्री व्हाला आणि मन शांत होईल. यात अनेक प्रकारचे मेडिटेशनचे प्रकार आणि ते करण्याच्या सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. आईओएस आणि अॅनरॉईड मोबालईवर उपलब्ध असलेले हे अॅप तुम्हाला ऑफिसमध्ये अगदी स्ट्रेस फ्री राहण्यास मदत करेल.  मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आहारात या '९' पदार्थांचा समावेश करा !