कॅन्सरचा वाढता धोका लक्षात घेता कॅन्सर होऊ नये म्हणून अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (WHO)नुसार, 2020 मध्ये जगात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असेल. अधिकतर महिलांमध्ये आढळणारा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काही विशिष्ट्य पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामने घरच्या घरी सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखा
ग्रीन टी
वजन कमी करणे, ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याबरोबरच ग्रीन टीचे इतर अनेक फायदे आहेत. ग्रीन टी मध्ये पॉलीफेनोल अँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सीडेंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणारे DNA डॅमेजपासून सेल्स(पेशी) सुरक्षित ठेवतात. सध्या यावर अधिक संशोधन सुरु आहे. पण रोज ग्रीन टीचे सेवन केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. या '5' लक्षणांवरुन ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका !
डाळींब
ब्रेस्ट कॅन्सरला आळा घालण्यासाठी डाळींब अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतं. डाळींबात देखील पॉलीफेनोल असतं. त्यामुळे कॅन्सरला प्रतिकार होतो. 2009 मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, डाळींबाच्या रसात ब्रेस्ट कॅन्सर रोखण्याचे गुणधर्म असतात. मात्र ब्रेस्ट कॅन्सराला आळा घालण्यासाठी किती प्रमाणात डाळींबाचे सेवन करण्याची गरज आहे, हे अजून सिद्ध झालेले नाही. मात्र तुम्हाला मधुमेह असल्यास डाळींबाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हळद
प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात हमखास मिळणारा पदार्थ म्हणजे हळद. हळदीत कॅन्सर फायटिंग कंपाऊंड करक्युमिन असतं. या कंपाऊंडमुळे ब्रेस्ट कॅन्सरबरोबरच फुफ्फुसं आणि त्वचेचा कॅन्सर रोखण्यासही मदत होते. त्यामुळे आहारात हळदीचा समावेश अवश्य करा.
लसूण
कॅन्सरला रोखणारं एलियम कंपाऊंड लसणात असतं. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरबरोबरच प्रोस्टेट कॅन्सर आणि इतर प्रकारचे कॅन्सरला आळा घालण्यात मदत करतं. लसणासोबतच कांद्यात देखील कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. 2007 मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांनी ब्रेस्ट कॅन्सरवर लसणाचा प्रयोग करुन पाहिला आणि त्याचे उत्तम परिणाम समोर आले.
अळशी
अळशीत ओमेगा-3, लिगनन्स आणि फायबर्स असतात. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचे सेल्स तयार होण्यास आळा बसतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात अळशीचा वापर करणे गरजेचे आहे.
बेरीज
बेरीज मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. यामुळे शरीरात कॅन्सर पेशी बनण्यास आळा बसतो. म्हणून आहारात ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, रसबेरीजचे अवश्य सेवन करा.