World Malaria Day 2019: मलेरिया रोगाची लक्षणे, उपाय आणि सुरक्षितता
Marielia (file photo )

World Malaria Day 2019: आजचा दिवस (25 एप्रिल ) जगभरात जागतिक मलेरिया दिन (World Malaria day) जगभरात साजरा केला जात आहे. खास करुन मलेरिया (Marielia) रुग्णांची संख्या पावसाळ्यात वाढते. मलेरिया आजाराची एखाद्या व्यक्तीला होणारी लागण ही पूर्णपणे त्याच्या शरीरावर अवलंबून असते. म्हणजेच विशिष्ट व्यक्तिचे शरीर मलेरियाच्या व्हायरसला कसा प्रतिकार करते यावर या रोगाची लागण होण्याचे प्रमाण ठरते. एखाद्या व्यक्तीच्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर त्याला मलेरिया रोगाची लागण होण्याची शक्यता कमी असते. मलेरिया हा उपचारांनी नियंत्रणात येणारा आजार असला तरी तो जिवघेना नक्कीच नाही. परंतू, उपाचारात दिरंगाई झाली तर हा आजार जीवघेणा ठरु शकतो. जाणून घ्या मलेरिया आजार लक्षणे (Symptoms Of Marielia), मलेरिया आजार उपाय (Malaria Disease Treatment) आणि सुरक्षितता.

मलेरिया आजार लक्षणे

  • मलेरिया आजाराची लागण झाली की रुग्णाला ताप येतो.
  • अधीक प्रमाणात ताप आणि सोबतच हातापायाला कापवणारी थंडी
  • अचानक थंडी वाजून ताप येणे. थोड्याच वेळात अंगाला घाम (किंवा उकाडा जाणवने) , सोबत ताप कायम राहणे.
  • अधिक घाम आल्यानंतर ताप कमी होणे मात्र अशक्तपणा जाणवने.
  • सलग दोन ते तीन दिवस ताप कायम राहणे.

(हेही वचाा, World Malaria Day 2019: मलेरिया दिनाच्या औचित्यावर आफ्रीका देशात मुलांसाठी सुरु करण्यात आली पहिली मलेरिया लस)

मलेरियापासून बचाव

  • वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • रक्ताची तपासणी घेऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घ्या.
  • मलेरिया हा औषधांनी बरा होणारा आजार आहे. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.
  • खास करुन ताप आला असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

केवळ भारतापुरते बोलायचे तर, एका अहवालानुसार भारतात वर्षाकाटी सुमारे 18 लाख लोकांना मलेरियाचा सामना करावा लागतो. जगभराच्या तुलनेत 80 टक्के घटना भारत, इथियोपिया, पाकिस्तान आणि इंडोनेशिया देशातील असतात असे जागतिक मलेरिया अहवाल सांगतो. उडीसा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात.