जगातील पहिली मलेरियाची लस (Malaria Vaccine) आफ्रीकेत वर्ल्ड हेल्थ ऑरगनायजेशनने (World Health Organisation) सुरु केल्याची घोषणा करण्यात आली आहे. आफ्रिकेतील महाद्विप येथे 2 वर्षांच्या मुलाला जगातील पहिली मलेरियाची लस देण्यात आली. 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिवस (World Malaria Day) म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त पहिल्या लसीबद्दलची घोषणा करण्यात आली आहे.
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकेतील देशात सुमारे साडे तीन लाख मुलांना मोठ्या प्रमाणावर पायलट प्रोजेक्ट अंतर्गत जगातील पहिली लस देण्यात आली. या लसीचे नाव RTS,S आहे.
या लसीमुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मलेरियांच्या डासांचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही. जगभरात मलेरियाचे डास असून आफ्रिकेत त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मलेरियाच्या इतर लसींच्या तुलनेत ही लस तीन टप्प्यात तयार करण्यात आली असून ही अत्यंत परिणामकारक आहे.
भारताने 2027 पर्यंत मलेरिया मुक्त होण्याचा आणि 2030 पर्यंत या आजाराचा समूळ नायनाट करण्याचे निर्धार केला आहे. त्यामुळे देशभरात मलेरिया आजारासंबंधित जागृकता करण्यासाठी मोहिम राबवण्याची आवश्यकता आहे.