PMS म्हणजे नेमकं काय? महिलांनी हा त्रास ओळखून उपचार कसा करावा, जाणून घ्या सविस्तर
PMS (Photo Credits: PixaBay)

मासिक पाळीच्या (Menstruation) काही दिवस आधी होणारा हा त्रास म्हणजेच पीएमएस (PMS). वैद्यकीय भाषेत सांगायचे झाले तर प्री- मेन्स्ट्रयूल सिंड्रोम (Pre-Menstrual Syndrome) हा हार्मोनल स्थितीमुळे (Hormonal Imbalance) उद्भवणारा त्रास आहे. छोट्याछोट्या गोष्टीने सुद्धा खूप चिडचिड होणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि या सगळ्यामुळे मानसिक स्थिती कंट्रोल बाहेर जणी ही काही याचे ठळक दिसून येणारे लक्षणे आहेत. प्रत्येक महिलेच्या सहनशक्तीनुसार कमी अधिक प्रमाणात याचे परिणाम दिसून येतात. मुळातच ही कोणतीही व्याधी नसून शरीरातील बदलाच्या  दरम्यान सुरु असणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे यावर कोणताही वन टाइम उपाय मिळणार नाही, मात्र हा त्रास निधान सहन करता यावा यासाठी आज आम्ही आपल्याला काही उपाय सुचवणार आहोत.

तत्पूर्वी, पीएमएस म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणं कोणती हे जाणून घेऊयात..

- रोजच्या धकाधकीत अगोदरच शरीर थकत असते,ताण- तणावाने दमलेल्या शरीराला हार्मोनल बदलांचा प्रभाव जाणवून पीएमसिंग सुरु होते.

- वेळेवर आहार न घेणाऱ्या तसेच निकृष्ट दर्जाचे खानपान असणाऱ्या स्थूल स्त्रियांना हा त्रास सर्वाधिक जाणवत असतो.

- पीएमएसचे मुख्य लक्षण शारीरिक थकव्यापासून सुरु होते, पोटदुखी,पोटरी दुखणे, स्तनांचे दुखणे, डोकेदुखी, पाठदुखी असे प्रकार पहिले सुरु होतात. (Sex Tips During Periods: मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करण्यापासून अडवतायत का 'हे' प्रश्न? जाणून घ्या पिरयेड सेक्सचे फायदे आणि टिप्स

- यांनतर लगेचच मानसिक तणाव देखील वाढू लागतो, नैराश्य, अचानक मूड बदलणे, चिडचिड होणे, रडू येणे असे प्रभाकर सुद्धा काहींच्या बाबतीत घडतात.

- पीएमएसचा मोठा परिणाम तुमच्या पाच प्रक्रियेवर देखील होतो, वाताचा त्रास, बद्धकोष्ठता, अतिसार अशी लक्षणे काहींना जाणवतात.

अर्थात ही सर्वच लक्षणे प्रत्येक स्त्री मध्ये दिसून येत नाहीत तर यावर एक सरळ उत्तर देखील नाही. मात्र अनेक महिलांना येणारा अनुभव पाहता केलेल्या सर्व्हेनुसार काही उपचार आपण करू शकता..

- सुरुवातीपासूनच शरीराला योगा, व्यायाम याची सवय लावा. योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली स्वीकारा.

- याशिवाय ही लक्षणे अनुभवू लागल्यास, अँटी स्ट्रेस, अँटी डिप्रेशन अशी औषधे घेऊ शकता.

- अतिवेदना होत असल्यास वेदनाक्षमक गोळ्या घेऊ शकता.

-सूज कमी करण्यासाठी डाययुरिटिक्स घेऊ शकता.

-ओटीपोटाच्या भागाला गरम पाण्याचा शेक द्या.

(महत्वाची टीप: हे उपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या)