मासिक पाळीच्या (Menstruation) दरम्यान अनेक महिलांना नेहमीपेक्षा आणखीनच उत्तेजित फील होते पण अशा वेळी सेक्स केल्याने संसर्गाचा धोका वाढतो का? गरोदर राहू शकतो का? स्वच्छेतेचं काय ? हे आणि असे अनेक प्रश्न त्यांना आपली भावना पार्टनर कडे बोलून दाखवण्यापासून रोखून धरतात. दुसरीकडे पुरुषांना सुद्धा कितीही सेक्सची इच्छा (Sex Drive) असली तरी आपण पाळीच्या वेळी अशी मागणी करणे चुकीचे ठरेल का? यामुळे आपल्या पार्टनरचा त्रास आणखीनच वाढेल का? अशी भीती सतावत असते. या प्रश्नांमुळे महिन्यातून साधारण पाच दिवस दोघेही इच्छा असूनही सेक्स केल्यावाचून राहतात. पण आता यापुढे असे करण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अशा टिप्स ज्याचा वापर करून तुम्ही मासिक पाळी सुरु असताना सुद्धा सेक्सची मजा अनुभवू शकता, आणि बरं का मंडळी या पीरियेड सेक्सचे (Period Sex) काही भन्नाट फायदे सुद्धा तुमच्या शरीराला होऊ शकतात..
अलीकडेच झालेल्या एका सर्व्हेनुसार साधारण 30% लोक हे मासिक पाळीदरम्यान सेक्स करतात.हे ऐकायला जरी विचित्र वाटत असेल तरी डॉक्टरांच्या मते देखील या प्रकारचा सेक्स करण्यात काहीच गैर नाही. उलट तुम्हाला व तुमच्या पार्टनरला हरकत नसेल तर शारीरिक संबंध ठेवल्यास शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. चला तर मग पाहुयात काय आहेत हे फायदे
- अनेक महिलांना मासिक पाळीत डोकेदुखीचा तसेच क्रॅम्पसचा त्रास होतो. या वेदना इतक्या तीव्र असतात की अनेकदा त्या सहनही होत नाहीत. मात्र पिरियेड सेक्स केल्याने योनीच्या स्नायूंची हालचाल होऊन या क्रॅम्पसची तीव्रता कमी होऊ शकते. यामुळे परिणामी डोकेदुखीपासूनही आराम मिळतो.
- मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्यास, तुमच्या शरीरातील मेन्स्ट्रूअल टिश्यूजचा फ्लो वाढतो. त्यामुळे तुमची मासिक पाळी जास्त काळ राहात नाही. तसंच क्लॉटिंगचा प्रॉब्लेमही यामुळे निघून जातो. Sex Knowledge: सेक्स केल्यावर 'या' कारणांमुळे योनीला येते सूज
- पीरियेड सुरु असताना योनी मार्गातून स्त्राव होत असतो ज्यामुळे नैसर्गिकरीत्याच ओलावा असतो अशावेळी सेक्स केल्यास पार्टनरचे शिश्न सहजतेने आत बाहेर होते. यातून सुरुवातीला होणारा त्रास कमी होतो.
- मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदल होत असतात या हॉर्मोन्सच्या जलद हालचालीमुळे सेक्स ड्राइव्ह उत्पन्न होते. त्यामुळे एका अर्थी बघायला गेल्यास हा महिलेला ऍक्टिव्ह सेक्सचा अनुभव देणारा अगदी योग्य कालावधी आहे.
पीरियेड सेक्स करताना लक्षात घ्या या गोष्टी
- सेक्सचे फायदे किंवा डॉक्टरांचे मत काहीही असेल तरीही तुमच्या पार्टनरचे मत सर्वात जास्त महत्वाचे आहे. हे जाणून घेण्यासाठी एक हेल्दी आणि थेट संवाद साधा.
- जर का तुम्ही दोघेही तयार असाल तरच पुढे जा
- मासिक पाळी दरम्यान अशुद्ध रक्त बाहेर येत असते त्यातून सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.पुरुषाला जितका हा धोका असतो तितकाच महिला पार्टनरला सुद्धा ही भीती असते कारण यावेळी महिलेचा सर्व्हायकल वॉल जास्त प्रमाणात उघडा राहतो. यावर उपाय म्हणजे मासिक पाळी दरम्यान सेक्स करायचा असेल तर तुमच्या जोडीदाराने कंडोमचा वापर नचुकता करावा.
- मासिक पाळीतील सेक्समुळे बेडशीट खराब होईल हा सर्वात मोठा प्रश्न असतो यावर उपाय म्हणजे शक्य असल्यास बाथरूम मध्ये सेक्स करा ज्यामुळे हा प्रश्नच येणार नाही.
-सेक्स कुठे करायचा प्रश्न सुटल्यावर आता कसा करायचा हे तुम्हा समजत नसेल तर यावर उत्तर म्हणजे मिशनरी पोझिशन. कारण जेव्हा तुम्ही पाठीच्या बाजूला झोपता तेव्हा रक्ताचा प्रवाह कमी होतो.
-लक्षात घ्या मासिक पाळीत सेक्स करणे हे जरी मजेशीर असले तरी स्वच्छता देखील तितकीच आवश्यक आहे त्यामुळे न चुकता सेक्स नंतर प्रायव्हेट पार्ट कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा.
-मासिक पाळीदरम्यान सेक्स करताना तुमच्या मनाची किती तयारी आहे ते पाहणं गरजेचं आहे. '
(टीप- हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिला आहे, याला वैद्यकीय सल्ला समजू नये, अशा प्रकारची कृती स्वतः करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा)