
Vaginal Swelling After Sex: जोडीदारासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर अनेक महिला, तरुणींच्या योनीला सूज (Vaginal Swelling) येते. हा त्रास सर्वच महिला, तरुणींना होतो असे नाही. परंतू, काही महिलांना मात्र हा त्रास वारंवार होत असतो. त्यामुळे आनंददाई ठरणार शरीरसंबंधाचा अनुभव अनेकींसाठी अत्यंत वेदनादाईच ठरु शकतो. योनीला येणारी सूज ही वेदनादाई, त्रासदायक असली तरी आपल्याकडे लैंगिक विषयांवर बोलायचेच नाही असा एक अलिखीत नियम असल्याने अनेक महिला या त्रासाची वाच्यताच करत नाहीत. अनेक महिला तर आपल्या जोडीदाराशीही या विषयावर बोलत नाहीत. त्यामुळे इतर लैंगिक विषयांप्रमाणेच या त्रासाबातही एक मौनच बाळगले जाते. पण, असे मौन बाळगण्याचे काहीच कारण नाही. प्राप्त माहितीनुसार, आज आम्ही इथे या विषयावर मोकळेपणाने मांडणी करत आहोत. जाणून घ्या सेक्स केल्यानंतर योनीला का सूज येते?
ल्युब्रिकेंट न वापरणे: सेक्स केल्यानंतर योनीला सूज येण्याची प्रमुख 5 कारणे आहेत. त्याली पहिले कारण शरीरसंबंधांदरम्यान ल्युब्रिकंट न वापरणे. जर आपण शरीरसंबंधांदरम्यान आपल्या योनिमध्ये नैसर्गिकरित्या ल्युब्रिकंट निर्माण होत नसेल आणि आपणही ल्युब्रिकंट वापरत नसाल तर सहाजिक आहे की, अतिघर्षणामुळे योनीला सूज येते. यावर पहिला उपाय म्हणजे फोरप्लेसाठी वेळ द्या. जेणेकरुन आपल्या जोडीदाराची आणि स्वत:चीही उत्तेजना वाढेन. त्यानंतर आपल्याला या त्रासाचा सामना करावा लागणार नाही. पण, तहीरी हा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते ल्युब्रिकंट वापरणे हिताचे.
अॅलर्जी: काही महिला, तरुणींची योनी ही अधिक संवेदनाशील (सेन्सेटीव्ह) असते. त्यामुळे अशा योनीला कंडोमचा स्पर्ष झाल्याने अॅलर्जी निर्माण होते. अशा महिलांचा जोडीदार जर लॅटेक्सवाला कंडोम वापरत असेल तर त्यामुळे महिलांना व्हजायनल कनाल आणि आजूबाजूच्या भागात कोरडेपणा तसेच इरिटेशन होते. त्यामुळे अशा महिलांच्या जोडीदारांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो कंडोम वारण्यास अडचण नाही.

एंडोमेट्रियॉसिस आजार: एंडोमेट्रियॉसिस हा एक महिलांच्या गर्भाशात होणारी समस्या आहे. ज्यामुळे एंडोमेट्रियम टिश्यूतून गर्भाशयात विशिष्ट प्रकारचा एक थर तयार होतो. गर्भाशयात असा थर साचल्याने एंडोमेट्रियम टीश्यूंमध्ये वाढ होते आणि तो गर्भाशयाबाहेरही वाढू लागतो. या आजारामुळेही सेक्स केल्यावर योनीला सूज येऊ शकते. काही महिलांना तर सेक्स करतानाही त्रास जाणवू लागतो. तसेच, सेक्स केल्यानंर योनीभागातून वेदना जाणवू लागतात.
युटीआयचा त्रास: जर एखादी महिला किंवा तरुणीस यूरिनरी ट्रॅट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआयचा आजार असेल तरीसुद्धा शरीसंबंध करताना त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास सहन करुन सेक्स केल्यानंतर अशा महिलांच्या योनीला सूज येऊ शकते. या त्रासाकडे दूर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. सामान्य मूत्रचाचणी (यूरिन टेस्ट) केल्यानंतरही या आजाराची माहिती कळू शकते.
व्हजायनिसमसची समस्या: ही एक अशा प्रकारची समस्या आहे ज्यात आपले पेल्विक फ्लोर मसल्स ओव्हरअॅक्टीव्ह होतात. याचा अर्थ असा की, आपली पेल्विक फ्लोर मांसपेशी पेनिट्रेटिव सेक्सदरम्यान स्ट्रेच आणि रिलॅक्स होण्याऐवजी टाईट होतात. याचे प्रमाण इतके वाढते की, व्हजायनल कनाल बंद होते. परिणामी योनीला सूज येऊ शकते. अशा वेळी आपल्या जवळच्या गायनॅकॉलजिस्ट याच्याशी संपर्क करा. (हेही वाचा, Sex Knowledge: सेक्स केल्यावर पुरुष लगेचच डाराडूर झोपी का जातात...? अनेक महिला जोडीदारांनाही सतावतो हा प्रश्न)

शरीरसंबंध अथवा लैंगिकता हा विषय गेली अनेक शतकं आपल्याकडे नेहमी टाळला जातो. सार्वजनिक ठिकाणी, घरात किंवा दोन व्यक्तींमध्येसुद्धा हा विषय अत्यंत गोपनीयतेने बोलला जातो. इतका की या विषयावर बोलायचे म्हणजे आपण एखादा अपराधच करतो की काय असे भाव लोकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. पण, या विषयाला इतके टाळण्याची गरज नाही. तर, या विषयावर खुलेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे. केवळ उघड चर्चा न झाल्याने आणि योग्य माहिती न मिळाल्याने अनेक लोक न्यूनगंडात जगत असल्याचेही पाहायला मिळते.
(महत्त्वाची सूचना: या लेखाचा उद्देश हा केवळ माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. स्वत:च्या जबाबादारीवर घरगुती/नैसर्गिक उपचार करण्यापूर्वी, माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे)