Sex Knowledge: सेक्स केल्यावर पुरुष लगेचच डाराडूर झोपी का जातात...? अनेक महिला जोडीदारांनाही सतावतो हा प्रश्न
After Intercourse | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Sex Knowledge: सेक्स (Sex) अनुभवलेल्या अनेक मंडळींना याची प्रचिती आली असेन की, सेक्स केल्यानंतर महिला अधिक उत्साहीत होतात तर, पुरुष पेंगूळले होऊन झोपेच्या आधीन होतात. काही जोडप्यांमध्ये या कारणावरुन अनेकदा वादही होतात. कोणत्याही महिला जोडीदाराला सेक्स केल्यानंतर आपल्या जोडीदारासोबत गप्पा मारायला, प्रेमाने त्याच्या मिठीत शिरण्यात, cuddle करण्यात अधिक आनंद असतो. तर, दुसऱ्या बाजूला पुरुषांना मात्र सेक्स करुन झाले रे झाले की, लगेच डाराडूर झोपायला आवडते. पुरुषांच्या या वागण्यामुळे अनेकदा महिलांना वाटू लागते की, त्याला (जोडीदार) आपल्या रिलेशनशिपमध्ये आता फारसे स्वारस्य राहिले नाही. पण, सेक्सनंतर पुरुषांच्या डाराडूर झोपण्यापाठीमागे एक बायोलॉजिकल कारण आहे. म्हणूनच जाऊन घ्या हे बायोलॉजिकल कारण ज्यामुळे सेक्स केल्यावर पुरुषांना लागते गाढ झोप.

लैंगिक विषयात संशोधन करणाऱ्या अभ्यासकांच्या अनेक संशोधनांमध्ये आढळन आले आहे की, सेक्शुअल इंटरकोर्स नंतर पुरुषांमध्ये थकव्याची भावना निर्माण होते. त्यांचा श्वासोच्छ्वासही वाढलेला असतो. त्यामुळे त्यांना झोप येऊ लागते. तसेच, इजैक्युलेशन दरम्यान, पुरुषांच्या शरीरात विविध प्रकारचे हॉर्मोन आणइ केमिकल्स तया होतात ज्यामुळे परुषांना झोप येऊ लागते.

इंटरकोर्स दरम्यान, परुष क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे त्यांना लैंगिक समाधान मिळाल्याची भावना होते. ही भावना निर्माण होत असतानाच शरीरात एक विशिष्ट प्रकारचा हॉर्मोन तयार होतो. या हॉर्मोनला प्रोलॅक्टीन असे म्हणतात. प्रोलॅक्टीन हे हॉर्मोन शरीरात निर्माण झाल्याने झोप येऊ लागते. (हेही वाचा, Oral Sex एन्जॉय करताना, स्त्रियांना खुश ठेवण्यासाठी अशी घ्या आपल्या प्रायव्हेट पार्टसची काळजी)

सेक्स आणि क्लायमॅक्स दरम्यान निर्माण झालेला तणाव आणि श्रम यांमुळे शरीरात उर्जा निर्माण करणारे हॉर्मोन ग्लायकोजन या संप्रेरकाची शरीरातील मात्रा कमी होत जाते. त्यामुळेही सेक्स केल्यानंर परुषांना झोप येऊ लागते. आणखी एक महत्त्वाचे कारम म्हणजे परुषांच्या शरीरातील स्नायू महिलांपेक्षा तुलनेत अधिक असतात. त्यामुळे सेक्स केल्यानंतर महिलांच्या तुरनेत पुरुष अधिक थकतात, असे अभ्यासक सांगतात.

सेक्स दरम्यान शरीरात निर्माण होणारा लव हॉर्मोन ऑक्सिटोसिन हेही शरीराला रिलॅक्स करण्यास मदत करते. त्यामुळेही समागमाची अनुभूती घेतल्यानंतर परुषांना विशिष्ट प्रकारचे समाधान मिळते त्यामुळेही पुरुषांना झोप येऊ लागते. महत्त्वाचे म्हणजे संभोग करत असताना महिला जोडीदाराच्या तुलनेत पुरुष अधीक श्रम करतात. त्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती खर्च होते आणि त्यांना झोप येते. ज्यामुळे ते आफ्टरप्लेमध्ये सहभआगी होऊ शकत नाहीत.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)