प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

पुरुष आणि स्त्रीमधील आनंदी नाते हे प्रेम, विश्वास यांसोबतच लैंगिक जीवन, म्हणजेच सेक्स (Sex) या गोष्टीवरही अवलंबून आहे. सेक्सचा कालावधी, सेक्सचे प्रमाण यांपेक्षा कोणत्या प्रकारे सेक्स होत आहे, त्यामध्ये दोघेही सुखी आहेत का? या गोष्टी महत्वाच्या ठरतात. सेक्सशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या स्त्रिया बोलून दाखवत नाहीत, मात्र त्या समजणे महत्वाचे आहे. उदा. ओरल सेक्स (Oral Sex). स्त्रियांना ओरल सेक्स आवडतो, मात्र त्या ती गोष्ट बोलून दाखवत नाहीत. ओरल सेक्सआधी महत्वाची ठरते ती म्हणजे तुमच्या प्रायव्हेट पार्टसची स्वच्छता. स्त्रियांना प्रायव्हेट पार्टसची दुर्घंधी अजिबात आवडत नाही, मात्र पुरुषांच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे सेक्सआधी आपले प्रायव्हेट पार्टस आणि ती जागा यांची व्यवस्थित काळजी घ्या.

> दिवसभर घट्ट पॅन्ट, जिन्स घातल्यास त्वचेला पुरेशी खेळती हवा मिळत नाही. परिणामी शिश्नाला उग्र वास येऊ शकतो. त्यामुळे तुमचे गुप्तांग नियमित स्वच्छ करा. केवळ नियमित साबणाने तेथील भाग धुणे पुरेसे नाही, तर अ‍ॅन्टी बॅक्टेरियल साबणाचा वापर करा.

> प्रायव्हेट पार्टसच्या जागी असणाऱ्या घामामुळे अशा ठिकाणी इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. काही वेळेस अशा जागी खाजही सुटते. यासाठी एक चांगले ‘इंटीमेट वॉश’ (Intimate wash) वापरणे गरजेचे आहे.

> अंघोळ करताना शीश्नाची त्वचा मागे सारून टोक व्यवस्थित स्वच्छ करा. बरेचवेळा याठिकाणी एक पांढरा थर साचून राहतो, ज्याचे पुढे जाऊन इन्फेक्शनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते.

> मॉईश्चर कमी म्हणजे शरीराला येणारा वास कमी. त्यामुळे नियमित शिश्नाला कोरडे करणे गरजेचे आहे. ब्लो ड्रायरचा वापर करूनही तेथील भाग स्वच्छ करू शकता. (हेही वाचा: भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील 'या' चुका)

> शिश्नाला कोरडे करताना अंग पुसलेला, दमट टॉवेल वापरू नका, नेहमी कोरडे कापड वापरा.

> सुती कापडाचा अधिक वापर करा.  प्रामुख्याने उन्हाळ्यात येणारा घाम आणि त्याच्या उग्र वासापासून दूर राहण्यास मदत होते.

> गुप्तांगामधील केसांमध्येही  दुर्गंधी साचून राहते. ओलावा राहतो. त्यामुळे नियमित तेथील केसही ट्रिम करा.