Cigarette Smoking Research: धूम्रपानाचा (Smoking) केवळ तुमच्या हृदय आणि फुफ्फुसावरच परिणाम होत नसून तुमचा मेंदू (Brain) ही कायमचा संकुचित होऊ शकतो. एका संशोधनात यासंदर्भात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. बायोलॉजिकल सायकियाट्री ग्लोबल ओपन सायन्स (Biological Psychiatry Global Open Science) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षात असे दिसून आले आहे की, धूम्रपान सोडल्याने मेंदूच्या ऊतींचे (पेशींचे गट) आणखी नुकसान टाळता येते. परंतु ते मेंदूला त्याच्या मूळ आकारात परत आणणार नाही.
धूम्रपानामुळे मेंदूला अकाली वृद्धत्व येते -
धूम्रपान करणार्यांना वय-संबंधित मानसिक घट आणि अल्झायमर रोग होण्याचा धोका जास्त का असतो हे देखील अभ्यासात स्पष्ट केले आहे. लोकांच्या मेंदूचा आकार वयोमानानुसार, नैसर्गिकरित्या कमी होत असल्याने धूम्रपान केल्याने मेंदू वेळेआधीच वृद्ध होतो, असे सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी सांगितले. (हेही वाचा - Financial Aid to Quit Smoking: काय सांगता? धुम्रपान सोडण्यासाठी मिळणार आर्थिक मदत; इंग्लंडच्या Cheshire East शहरात सुरु होत आहे नवी योजना)
मानसोपचार विद्यापीठाच्या प्राध्यापक लॉरा जे. बेरूत यांनी सांगितले की, 'शास्त्रज्ञांनी धूम्रपानाच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष केले होते. आम्ही फुफ्फुसावर आणि हृदयावर धूम्रपानाच्या सर्व भयंकर परिणामांवर लक्ष केंद्रित करत होतो, परंतु आम्ही मेंदूकडे अधिक बारकाईने पाहण्यास सुरुवात केली तेव्हा हे स्पष्ट झाले की, धूम्रपान खरोखर तुमच्या मेंदूसाठी वाईट आहे.'
धुम्रपानाचा धोका डोसवर अवलंबून असतो -
अभ्यासासाठी, टीमने 32,094 लोकांच्या मेंदूतील धूम्रपानाचा इतिहास आणि धूम्रपानाच्या अनुवांशिक जोखमीवरील डेटाचे विश्लेषण केले. संशोधकांना धूम्रपानाचा इतिहास आणि धूम्रपानामुळे मेंदूच्या आनुवंशिक जोखमीचा संबंध आढळला. याशिवाय, धूम्रपान आणि मेंदूवर होणार परिणाम यांच्यातील संबंध डोसवर अवलंबून असतो. एखादी व्यक्ती दररोज जितकी जास्त धूम्रपान करते, तितके त्याच्या मेंदूचे अकाली वृद्धत्व वाढते. (वाचा - Oral Sex Worse Than Smoking: घशाच्या कर्करोगासाठी ओरल सेक्स हे धूम्रपानापेक्षाही धोकादायक; डॉक्टरांचा दावा)
तथापी, मध्यस्थी विश्लेषण नावाचा सांख्यिकीय दृष्टीकोन वापरून संशोधकांनी घटनांचा क्रम निर्धारित केला. ज्यामुळे धूम्रपान करण्यासाठी अनुवांशिक पूर्वस्थिती निर्माण होते. ज्यामुळे मेंदूचे प्रमाण कमी होते. मेंदूचा आकार कमी होणे हे वृद्धत्वाशी सुसंगत आहे, असं बिरुत यांनी सांगितलं आहे.
STORY | Smoking shrinks brain, genetics play important role, research finds
READ: https://t.co/MUtHDCcnD3 pic.twitter.com/nmjFCaoL4s
— Press Trust of India (@PTI_News) December 17, 2023
वृद्धत्व आणि धूम्रपान हे दोन्ही स्मृतिभ्रंशासाठी जोखीम घटक आहेत. दुर्दैवाने हे संकोचन अपरिवर्तनीय असल्याचे दिसते. वर्षापूर्वी धूम्रपान सोडलेल्या लोकांच्या डेटाचे विश्लेषण करून, संशोधकांना असे आढळून आले की त्यांचा मेंदू कधीही धूम्रपान न केलेल्या लोकांपेक्षा कायमचा लहान राहतो.