याआधी एका चिंताजनक अभ्यासात आढळून आले होते की, अनेक जोडीदारांसोबत मुखमैथुन म्हणजेच ओरल सेक्स करणाऱ्या पुरुषांना एचपीव्हीशी संबंधित डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका असतो. आता एका तरुण डॉक्टरचे म्हणणे आहे की, घशाचा कर्करोग होण्यासाठी धुम्रपानापेक्षा ओरल सेक्स हा घटक जास्त कारणीभूत असतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटी (ACS) ने तंबाखूचा वापर हा ऑरोफॅरिंजियल कॅन्सर (Oropharyngeal Cancer) म्हणून ओळखल्या जाणार्‍या आजारासाठी नंबर एक जोखीम घटक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता डॉ. डारिया सदोव्स्काया (Dr. Daria Sadovskaya) या डॉक्टरने टिकटोक व्हिडिओमध्ये सांगितले की, ऑरोफॅरिंजियल कॅन्सरसाठी धुम्रपानापेक्षा ओरल सेक्स जास्त कारणीभूत आहे.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनेही घशाच्या कर्करोगाचे एक संभाव्य कारण म्हणून ओरल सेक्स उद्धृत केले आहे. कारण सामान्यतः एचपीव्ही (HPV) म्हणून ओळखले जाणारे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस हे ओरल सेक्सद्वारे प्रसारित होऊ शकतात. एचपीव्ही हा 200 पेक्षा जास्त संबंधित विषाणूंचा समूह आहे, ज्यापैकी काही योनिमार्गातून, गुदद्वारातून किंवा मुखमैथुनाद्वारे पसरतात. एचपीव्ही हा सर्वात सामान्य लैंगिक संक्रमित संसर्ग आहे व याची यूएसमध्ये दरवर्षी अंदाजे 13 दशलक्ष नवीन प्रकरणे आढळतात.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)