Smoking in Vande Bharat Train: देशातील हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये धुम्रपान करण्यास मनाई आहे. अशात सिगरेटमुळे धावती वंदे भारत ट्रेन थांबल्याची घटना समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला ट्रेन पूर्ण वेगाने धावत असताना सिगारेट ओढण्याची इच्छा झाली. ही अत्याधुनिक ट्रेन आहे आणि त्यात धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे हे त्याला माहीत होते. असे असूनही, तो आपली सिगरेटची तलफ पूर्ण करण्याच्या मार्गांचा विचार करू लागला.

आपली सिगारेटची तृष्णा भागवण्यासाठी हा प्रवासी भरधाव वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये घुसला. तिथे त्याने सिगारेट पेटवली. मात्र सिगारेटचे एक-दोन पफ घेतल्यावर धूर टॉयलेटमध्ये पसरला. यानंतर ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या सेन्सर्सच्या संपर्कात धूर आला आणि त्यानंतर मोठ्याने सायरन वाजू लागले. यामुळे ट्रेनमधील प्रवासी चिंतेत पडले. काही मोठी दुर्घटना घडली आहे की काय अशी भीती सर्वांना वाटू लागली. मोठा सायरन वाजल्यानंतर ट्रेन मध्येच थांबवण्यात आली. जेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका व्यक्तीने ट्रेनच्या बाथरूममध्ये सिगारेट पेटवल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा: WR Power Block Of Mumbai Local: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेमार्गावर नाईट ब्लॉक; शेवटची ट्रेन वांद्रे स्थानकापर्यंतच!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)