Assam Shocker: सिलचरमध्ये आईने आपल्या 20 महिन्यांच्या बाळाला दारू पाजली, सिगारेट ओढण्यास भाग पाडले; तपास सुरु (See Photo)
चाइल्ड हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री सिलचरच्या चेंगकुरी येथे एका आईने बाळाला धुम्रपान करण्यास भाग पाडले आणि दारू पाजली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून आईला ताब्यात घेतले.
Mother Forces Her Child To Smoke Cigarette, Drink Alcohol: आसाममधील सिलचरमध्ये आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेने आपल्या 20 महिन्यांच्या बाळाला सिगारेट ओढण्यास आणि दारू पिण्यास भाग पाडल्याचे आढळून आले आहे. वृत्तानुसार, बुधवारी रात्री सिलचरच्या चेंगकुरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. अहवालात असे सूचित होते की, स्थानिक चाइल्ड हेल्पलाइन सेलला त्या महिलेबद्दल तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर एक फोरो समोर आला ज्यांनी कथित दाव्यांना समर्थन दिले. तक्रारीनंतर लगेचच पोलीस महिलेच्या घरी पोहोचले, मुलाची सुटका केली आणि आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
माध्यमांना दिलेल्या निवेदनात, चाइल्ड हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री सिलचरच्या चेंगकुरी येथे एका आईने बाळाला धुम्रपान करण्यास भाग पाडले आणि दारू पाजली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून आईला ताब्यात घेतले आणि बाळाची सुटका केली. सध्या आई आणि मूल हे बालकल्याण समिती (CWC) च्या ताब्यात आहेत. याबाबत सखोल तपास केल्यानंतर, दृष्य पुरावे तपासल्यानंतर आणि आईची चौकशी केल्यानंतर, योग्य ती पावले उचलली जातील. (हेही वाचा: Dead Snake Served In Meal At Govt College: इंजिनीअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनच्या जेवणात सापडला मृत साप; अनेक विद्यार्थी पडले आजारी)
पहा पोस्ट-
In an absolutely disturbing incident, a woman has been found to allegedly force her 20-month-old child to smoke cigarettes and even drink alcohol. The incident took place in the Chengkuri area of Silchar on Wednesday night.
The Child Helpline Cell received a complaint with… pic.twitter.com/fwPZ593pts
— ForMenIndia (@ForMenIndia_) June 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2024 05:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

