Dead Snake Served In Meal At Govt College: बिहारमधील बांका येथे एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅन्टीनच्या अन्नात मृत साप आढळला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, असे साप असलेले अन्न खाल्ल्यानंतर किमान 10-15 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासह एका विद्यार्थ्याने तिथे पुरवणाऱ्या ब्रेडच्या स्थितीवरही प्रकाश टाकला. या ठिकाणी ‘एक्सपायर्ड’ असलेला ब्रेड पुरवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

अहवालानुसार, विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार ते 13 जूनच्या रात्री जेवायला गेले होते. यावेळी त्यांना मळमळ, उलट्या अशा समस्या सुरू झाल्या. नंतर त्यांना अन्नात एक छोटासा मेलेला साप दिसला. एका खाजगी मेसने हे जेवण दिले होते. रिपोर्टनुसार, विद्यार्थ्यांनी यापूर्वी कॉलेज व्यवस्थापनाकडे जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार केली होती. मात्र असे असूनही परिस्थिती जैसे थेच राहिली. घटनेनंतर बांका डीएम अंशुल कुमार, एसडीएम आणि एसडीपीओ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कॉलेजला भेट दिली. याबाबत उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांनी तपास केला असल्याचे सांगितले. मेस मालकाला दंड ठोठावण्यात आला आहे. (हेही वाचा: Air India: एअर इंडियाच्या प्रवाशाला त्याच्या जेवणात ब्लेड सापडले, एअरलाइनने जारी केले स्टेटमेंट)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)