Bihar : बिहारमधील अररिया येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना पोषण आहारातून(Mid-Day Meal) विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बाधित सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार (treatment )सुरू आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने त्याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सर्व ७० मुले रुग्णालयात उपचार घेत आहेत. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देखील एक अशीच घटना घडली होती. त्यावेळी बिहारमधील सीतामढी येथील एका प्राथमिक शाळेतील सुमारे 50 विद्यार्थ्यांना शाळेत शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली होती. त्यावेळी पोटदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. (हेही वाचा:Nanded Food Poisoning: नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 60हून अधिक नागरिकांची प्रकृतीत बिघाड
)
VIDEO | Around 70 school children were hospitalised after consuming mid-day meal in #Bihar's Araria yesterday.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/3UyMbCvZXc
— Press Trust of India (@PTI_News) March 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)