Nanded Food Poisoning: नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 60हून अधिक नागरिकांची प्रकृतीत बिघाड
Food Posion PC Pixabay

Nanded Food Poisoning: महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील १० ते १२ गावातील नागरिकांना विषबाधा झाली. जवळळपास ६० ते ७० नागरिकांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या नागरिकांवर उपजिल्हा आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवरात्रीच्या निमित्ताने गावकऱ्यांनी उपवासासाठी भगर खाल्ले होते. त्यातून विषबाधा झाल्याचे समोर येत आहे. गावकऱ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकिय विभागाने दिली आहे.

भगर खाण्याबाबात महत्त्वाची माहिती दिली आहे. वैद्यकिय विभागाने सांगितले की, भगर मोठ्या प्रमाणात अस्परजिल ((Aspergillus) प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन (Fumigaclavine) या सारखी विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे त्याचे सेवन केल्यानंतर विषबाधा होते. या घटनेनंतर नागरिकांनी काळजी घ्यावी अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (हेही वाचा- वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 28 जणांना विषबाधा

महाशिवरात्री निमित्त गावकऱ्यांनी उपवास ठेवला होता. उपवासामध्ये भगरचा आहार घेतला होता. उपवासानिमित्त हडसणी, वाळकी, बाभळी, गुरफळी, हरडफ,शिवणी, फळी या गावातील लोकांनी भगरचा आहार घेतला होता. भगर खाल्ल्यानंतर एकेक गावकऱ्यांना उलटी, अशक्तपणा, गरगरणे, चक्कर असा त्रास होऊ लागला होता त्यामुळे नागरिकांना जिल्हा आणि खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले.  वैद्यकिय तपासणीत भगरमुळे विष बाधा झाल्याचे समोर आले. सर्वांवर योग्य रित्या उपचार झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.